यवतमाळ:  यवतमाळ (Yavatmal News)  जिल्ह्यात बापलेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आर्णी (Arni)  तालुक्यातील तीन वर्षीय चिमुकल्या बाळाला जन्मदात्या बापाने दारूसाठी तेलंगणातील निर्मल येथे विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर वडिलांवर   गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलाच्या आईने या संदर्भात तक्रार केली होती. पती आणि पत्नीचे पटेनासे झाल्यामुळे ते दोघे मागील महिन्यापासून वेगळे राहत होते. त्यानंतर पीडित मुलगा हा आपल्या पित्यासोबत राहत होता. दरम्यान,  पोटच्या मुलाला बापाने चक्क दारूसाठी विकल्याची  धक्कादायक (Yavatmal Crime News) घटना उघडकीस आली. 


यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील तीन वर्षीय चिमुकल्या बाळाला जन्मदात्या बापानेच दारूसाठी तेलंगणातील निर्मल येथे विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी गुन्हा नोंद करत कोपरा गावातून वडीलांसह एकाला अटक केली. वडील श्रावण दादाराव देवकर (32 वर्षे) आणि चंद्रभान देवकर (65 वर्षे)  असे अटक करण्यात आलेला नाव आहे. तर कैलास लक्ष्मण गायकवाड (55) वर्ष रा. गांधी नगर आर्णी आणि बाल्या गोडांबे रा. महागाव कलगाव ता. दिग्रस असे दोघे फरार असून त्यांच शोध सुरू आहे. 


पत्नीने केली  तक्रार


आर्णी तालुक्यातील कोपरा गावातील पुष्पा देवकर(27) या गेल्या एक महिन्यापासून पती श्रावण याच्यापासून वेगळ्या राहत होत्या. त्यांना जय देवकर हा तीन वर्षांचा मुलगा असून तो वडील श्रावण देवकर यांच्यासोबत राहत आहे.  पती श्रावण आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्या तीन वर्षांचा मुलगा जय याला आदिलाबाद, तेलंगणा येथे विकल्याची माहिती आई पुष्पाला मिळाली. या प्रकरणी पुष्पा देवकर यांनी आर्णी पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता आर्णी पोलिसांनी श्रावण देवकर याच्यासह अन्य तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. 


दारूसाठी घरातील सामान विक्रीला विरोध केल्याने आईला संपवलं


लातूरात दारूसाठी घरातील सामान विक्रीला घेऊन जाण्यास विरोध केल्याने मुलानेच आईची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वर नाथराव मुंडे (वय 23 वर्ष) याला दारू पिण्याची सवय होती. तर, तो आई-वडील वडीलांसह राहत होता. ज्ञानेश्वरचा छोटा भाऊ कृष्णा हा पुणे येथे एका खाजगी कंपनीत कामाला आहे. दरम्यान ज्ञानेश्वरचे वडील कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. त्यामुळे, शेतातील घरात आई संगीता व मुलगा ज्ञानेश्वर हे दोघेच होते. दारुची सवय जडलेल्या ज्ञानेश्वर याला दारू पिण्याची इच्छा झाली. नुकतीच म्हैस विकल्याने घरात आईकडे पैसे असतील, असा अंदाज काढून दारू पिण्यासाठी ज्ञानेश्वर याने आईकडे पैशाची मागणी केली. तेव्हा 'माझ्याकडे पैसे नाहीत' म्हणताच घरात ठेवलेल्या डब्यातील डाळ व इतर जीवनोपयोगी साहित्य तो विक्रीसाठी घेऊन जात होता. घरातील किराणा साहित्य घेऊन जाण्यास आईने त्याला विरोध किला. तेव्हा रागाच्या भरात उखळात कुटण्यासाठी वापरण्याची लोखंडी मुसळ त्याने आईच्या डोक्यात मारून तिला गंभीर जखमी केले. याच मारहाणीत जखमी झालेल्या आईचा मृत्यू झाला.   


हे ही वाचा :