Yavatmal Pollution News : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील वणी (Wani) परिसरात दिवसरात्र होत कोळशाची वाहतूक (Transportation of Coal) सुरु आहे. यामुळं परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या कोळशाच्या प्रदुषणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. कारण या कोळशाच्या प्रदुषणामुळं शेती पिकांचे मोठं नुकसान होत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आलं आहे.


सोयाबीन, तूर आणि कापूस या पिकांच्या उत्पन्नात घट


प्रदूषणामुळु रस्त्यालगत असलेल्या शेतातील पिकांची उत्पादकात कमी होऊन आर्थिक नुकसान होत आहे. टिप्पर आणि ट्रॅकमधून कोळशाची वाहतूक ती झाकून नेणं गरजेचं आहे. तसेच या मार्गावर पाणी टाकणं गरजेचे आहे. मात्र, या कुठल्याच नियमांची अंमलबजावणी होत नसल्यानं रोड लगत असलेल्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहेत. सोयाबीन, तूर आणि कापूस या उत्पन्नात घट येत आहे. पिकांवरील पानावर अक्षरशा धुळीचा थर सासलेला आढळून येत आहे. 


वणी परिसरात 10 कोळसा खाणी


वणी परिसरात उकणी, मुंगोली, घोंसा, कुंभारखणी, नायगाव, निलजइ,  जुनाड, पिंपळगाव, कोल्हार पिंपरी, भांदेवाडा अशा दहा कोळसा खाणी आहे. तर परिसरात 22 गिट्टी क्रॅशर आहेत. या ठिकाणी शासनाचे सर्व नियम धाब्यावर ठेऊन रात्रंदिवस  कोळशाची वाहतूक सुरू राहते. त्यामुळं त्यातून धूळ बाहेर पडते. परिणामी यांचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याची दखल घेतली नाही. एकंदरीत या धुळीमुळं वणी परिसरातील शेतीपिकांची उत्पादन क्षमता कमी झाली आहे. प्रशासनाने या गंभीर मुद्याकडे लक्ष द्यावं, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


 रहदारी आणि कोळसा वाहतुकीमुळं प्रदूषण


यवतमाळ  जिल्ह्याच्या वणी परिसरात मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे. वणीत कोळसा खाणी असल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. रहदारी आणि कोळसा वाहतुकीमुळं प्रदूषण होत आहे. कोलडेपो चालकांनी कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत. रस्ते व्यवस्थीत नसल्यानं प्रदूषण होत आहे. ओव्हरलोड वाहतुकीवर कुठलीच कारवाई करण्यात येत नाही. अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.


 12 वर्षांपासून प्रदूषण विषय प्रलंबित


मागील 12 वर्षांपासून प्रदूषणाचा विषय लावून धरला आहे. प्रदूषण मंडळाकडे आणि प्रशासनाला वारंवार निवेदने, मोर्चे काढून प्रश्न मांडला आहे. वाहतुकीमुळं रस्त्याची चाळण झाली आहे. या धुळीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसान तसेच रोड लगतच्या घरात धूळ जाऊन नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. मात्र याची कुठलीच दखल अद्यापपर्यंत घेण्यात आली नाही. वेकोलीच्या कोळसा खदान करणाऱ्यांनी आपला स्वतंत्र रस्ता तयार करावा अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


कसान भरपाईसाठी पाठपुरावा करतोय : खासदार बाळू धानोरकर


ट्रकद्वारे कोळसा वाहतूक होतं असल्यानं शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होत आहे. चंद्रपूर आणि वणी परिसरात होत असलेल्या प्रदूषणाचा प्रश्न लोकसभेच्या अधिवेशनात मांडण्यात आला असल्याची माहिती चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर यांनी दिली. शेतकऱ्यांची होत असलेल्या नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करत असल्याचे धानोरकरांनी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या:


West Bengal Coal Scam Case : कोळसा घोटाळा प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; मुख्य आरोपींची 25 कोटींची संपत्ती जप्त