Agriculture News : पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Rain) तोंडचा घास हिरावला आहे.  जिल्ह्यातील 28 आणि 29 नोव्हेंबरला झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपातील कापूस (cotton), तूर या पिकांना जोरदार फटका बसला. यातून सावरत नाही तोवर ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे पुन्हा वेचणीला आलेला कापूस ओला झाल्यानं झाडावरच काळा पडत आहे. तर हिरवेगार कापसाचे झाडाचे बोंड झाडावरच वाळत चालले आहे. त्यामुळे कापसाची प्रत घसरत चालली आहे. 


हवामानामुळं कापसाची प्रत घसरली आहे. त्यामुळं बाजारात सात ते साडेसात हजार रुपये क्विंटल दराचा कापूस आता व्यापारी 6 हजार रुपये क्विंटल दराने खरेदी करीत आहे. त्यामुळं एकीकडे निसर्ग शेतकऱ्यांना रडवत आहे तर दुसरीकडे व्यापारी विक्रीसाठी नेलेला कापूस कमी दरात खरेदी करून रडवत असल्याचे चित्र आहे. 


कापसाला किमान 10 हजार रुपयांचा दर मिळावा ही मागणी


काही भागात कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळं शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. कपाशीचे अधिक नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर वेचणी करण्यात आली असून यंदा कपाशीला चांगला भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र सध्या कपाशीला कमी दर मिळत असून, उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान कापसाला किमान दहा हजार क्विंटल तरी भाव मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. 


पावसाचा पडलेला मोठा खंड त्यानंतर कापसावर आलेल्या लाल्या आणि मर रोगाचा प्रादुर्भाव यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. उत्पादन खर्चही निघणार नसल्याने सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: