मुंबई : अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांमुळे महिलांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. मात्र पाकिस्तानचा तालिबानी चेहरा दाखवणाऱ्या घटना समोर येत आहेत. 14 ऑगस्टला एका टिकटॉकर महिलेचा चारशेपेक्षा जास्त जमावाने विनयभंग केल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक आणि किळसवाणी घटना घडली आहे. भररस्त्यात चालत्या रिक्षात घुसून नराधमाने एका मुलीला किस केलं आणि तो पळून गेला. पाकिस्तानमधील लाहोर येथे ही घटना घडली असून त्या संबंधी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


लाहोरच्या गजबडलेल्या रस्त्यावर एका रिक्षातून दोन मुली आणि एक लहान मुलगा प्रवास करत होते. रस्त्यावर गर्दी असल्याने ही रिक्षा अत्यंत संथ गतीने जात होती. या रिक्षाचा मागील भाग उघडा होता.  अशातच एक नराधम त्या रिक्षात उडी घेतो आणि त्यातील एका मुलीचा किस करतो. त्यानंतर तो नराधम लगेच धूम ठोकतो. अचानक झालेल्या या घटनेमुळे त्या मुलींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. 


 






सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या पाकिस्तानातील या व्हिडीओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. सरकारने या नराधमावर कडक कारवाई करावी अशीही अनेकांनी मागणी केली आहे. 


त्या आधी 14 ऑगस्टला, पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीही अशीच एक धक्कादायक घटना घडली होती. त्यावेळी तब्बल चारशेहून अधिक जणांच्या समूहाने एका टिकटॉक स्टार असलेल्या मुलीचा विनयभंग केला होता. ग्रेटर इक्बाल पार्कमधील राष्ट्रीय प्रतीक समजल्या जाणाऱ्या मीनार-ए-पाकिस्तान इथं ही घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर लाहोर पोलिसांनी चारशे जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


तालिबानी सत्तेत आल्यानंतर अपगाणिस्तानमध्ये महिलांचे अधिकार आणि स्वातंत्र्यावर चर्चा केली जात असताना, त्यांच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली जात असताना जगभरात याहून काही वेगळी परिस्थीतीन नसल्याचं पाकिस्तानमधील या घटनेवरुन स्पष्ट झालं आहे. 


संबंधित बातम्या :