Yeti Airlines : नेपाळमधील पोखरामध्ये 72 जणांना घेऊन जाणारे येती एअरलाईन्सचे ATR 72 विमान कोसळून किमान 40 जणांचा मृत्यू झाला. प्राथमिक अहवालानुसार, विमानात (nepal plane crashes) 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर होते. हे विमान काठमांडूहून पोखरासाठी उड्डाण केल्यानंतर 20 मिनिटांनी काही किलोमीटर अंतरावर कोसळले. नेपाळमध्ये विमान अपघातांचा (Nepal history of plane crashes) मोठा इतिहास आहे.


डोंगराळ प्रदेश, हवामानाचा न येणारा अंदाज, नवीन विमाने आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीची कमतरता आणि खराब नियमन दुर्दैवी घटनांना कारणीभूत आहेत. एव्हिएशन सेफ्टी डेटाबेसनुसार, नेपाळमध्ये गेल्या 30 वर्षांत किमान 27 विमान अपघात झाले आहेत. नेपाळ भूमीवरील विमान अपघातात आतापर्यंत नेपाळमधील स्थानिकपासून ते नेपाळचे मंत्री, राजकन्या, भारतीयांसह अनेक देशी, विदेशी पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. (Timeline of plane crashes in Nepal)


जाणून घेऊया आतापर्यंतचे नेपाळमधील विमान अपघात 


मे 2022 


ठाण्यातील चार भारतीयांसह 22 जणांसह तारा एअरलाईन्सचे विमान नेपाळच्या डोंगराळ मुस्तांग जिल्ह्यात 29 मे रोजी कोसळले. विमानातील सर्व लोकांचे मृतदेह तीन दिवसांनी सापडले होते. खराब हवामानामुळे ही घटना घडली असावी, असा निष्कर्ष नेपाळ सरकारच्या चौकशी अहवालात आला आहे.


फेब्रुवारी 2019 


ढगाळ वातावरणामुळे काठमांडूमध्ये परत जाण्याचा प्रयत्नात असताना एअर डायनेस्टीचे हेलिकॉप्टर एका टेकडीवर कोसळले होते. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सात प्रवाशांमध्ये नेपाळचे पर्यटन मंत्री रवींद्र अधिकारी यांचा समावेश होता. 


मार्च 2018 


12 मार्च 2018 रोजी काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर 67 प्रवासी आणि चार क्रू सदस्यांसह जाणाऱ्या यूएस-बांगला एअरलाईन्सचे विमान कंपनी कोसळून 49 जणांचा मृत्यू झाला होता. ढाकाहून परतणाऱ्या विमानाला लँडिंगवेळी धावपट्टीपासून दूर गेल्याने आग लागली आणि विमानतळाजवळील फुटबॉल मैदानावर कोसळले आणि नंतर स्फोट झाला. 


फेब्रुवारी 2016 


नेपाळच्या कालीकोट जिल्ह्यात 11 जणांसह एअर काष्ठमंडप विमान कोसळले होते. या घटनेत दोन क्रू मेंबर्सचा मृत्यू होऊन सर्व नऊ प्रवासी जखमी झाले होते. 


मे 2015 


यूएस मरीन कॉर्प्स स्क्वॉड्रन नेपाळच्या चरिकोट प्रदेशात क्रॅश झाले होते. या घटनेत सर्व 8 प्रवासी ठार झाले होते. UH-1Y Huey सहा यूएस मरीन आणि दोन नेपाळी सैनिक, दोन भूकंप घटनांमधील पीडितांना मदत पोहोचवण्याच्या मोहिमेदरम्यान बेपत्ता झाले.


मे 2012


मे 2012 मध्ये 21 जणांसह डॉर्नियर विमान उंच उंचीवरील विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात उत्तर नेपाळमधील एका टेकडीवर कोसळल्याने 15 जणांचा मृत्यू झाला होता. हे विमान पोखरा विमानतळावरून जोमसोम विमानतळाकडे जात होते.


सप्टेंबर 2011


बुद्ध एअरद्वारे चालवलेले बीचक्राफ्ट 1900D जे पर्यटकांना एव्हरेस्ट पर्यटनासाठी घेऊन जात असताना एका टेकडीवर कोसळले.विमानातील सर्व 19 जणांचा मृत्यू झाला होता, त्यात 10 भारतीयांचा समावेश आहे. प्रतिकूल हवामान हे अपघाताचे कारण होते. कारण अपघातावेळी काठमांडू विमानतळ आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर मोसमी ढगांनी व्यापला होता.


सप्टेंबर 2006


पूर्व नेपाळमध्ये चार्टर्ड उड्डाण करताना श्री एअरचे हेलिकॉप्टर क्रॅश होऊन क्रू सदस्यांसह सर्व 24 प्रवाशांचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टरमध्ये वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरची मोहीम होती, ते एका संवर्धन कार्यक्रमातून परतले होते.


जून 2006


क्रू मेंबर्ससह सहा प्रवाशांसह यती एअरलाईन्सचे विमान जमिनीवर कोसळले होते. 


नोव्हेंबर 2001


पश्चिम नेपाळमध्ये उड्डाण करताना चार्टर्ड हेलिकॉप्टर कोसळले. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांमध्ये नेपाळची राजकुमारी प्रेक्ष्या शाह यांचा समावेश आहे.


जुलै 2000


रॉयल नेपाळ एअरलाइन्सचे ट्विन ऑटर धनगढी विमानतळाकडे जात असताना अपघातग्रस्त झाले होते. या अपघातात 22 प्रवासी आणि तीन क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला.


जुलै 1993


नेपाळजवळ चुले घोपटे टेकडीजवळ एव्हरेस्ट एअरचे डॉर्नियर विमान कोसळले. तिन्ही क्रू मेंबर्स आणि 16 प्रवासी ठार झाले.


सप्टेंबर 1992


पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सद्वारे संचालित एअरबस A300 काठमांडू विमानतळावर उतरत असताना क्रॅश होऊन 167 प्रवासी ठार झाले होते. हे विमान कराचीतील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत होते आणि काठमांडू विमानतळापूर्वी 11 किमी अंतरावर असलेल्या शेवटच्या डोंगराच्या कड्याला धडकले.


जुलै 1992


थाई एअरवेजच्या एअरबस 310 चा काठमांडूजवळ क्रॅश झाले  होते. त्यात सर्व 99 प्रवासी आणि 14 कर्मचारी मरण पावले. काठमांडूच्या उत्तरेला 37 किमी अंतरावर असलेल्या डोंगरावर मुसळधार पावसात विमान धडकले होते. 


जुलै 1969


रॉयल नेपाळ एअरलाइन्सचे विमान सिनारा विमानतळाकडे जात असताना क्रॅश होऊन 31 प्रवासी आणि चार क्रू सदस्य ठार झाले.


इतर महत्वाच्या बातम्या