Nepal Plane Crash Updates: नेपाळमधील विमान दुर्घटनेत आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. 72 जणांना घेऊन जाणारं यति एअरलाईन्सचं विमान पोखरा विमानतळाजवळ कोसळलं. यामध्ये पाच भारतीयांचा मृत्यू झाला आहे.
विमान अपघातामध्ये पाच भारतीयांचा मृत्यू झाल्याचं नेपाळ सिव्हिल एव्हिएशन ऑथेरिटीने एबीपी न्यूजला माहिती दिली. संजय जायसवाल, सोनू जायसवाल, अनिल कुमार राजभर, अभिषेक कुशवाह आणि विशाल शर्मा यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. काठमांडूमध्ये भारतीय दुतावास नेपाळ प्रशासनाच्या आणि यति एअरलाईन्ससोबत संपर्कात आहे.
विमान दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडामोडी घडल्या....
रायटर्सच्या वृत्तानुसार, विमानात पाच भारतीय, चार रशियन, एक आयरिश आणि दोन कोरियन नागरिक होते.
विमान दुर्घटना घडलेल्या ठिकाणी बचाव कार्य सुरु आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनुसार, अपघातानंतर विमानाला आग लागली होती.
नेपाळच्या सिव्हिल एव्हिएशन ऑथेरिटी (CAAN) नुसार, यति एअरलाईन्सचं विमान 9N-ANC-ATR-72 ने राजधानी काठमांडूच्या त्रिभुवन एयरपोर्टवरुन सकाळी 10.33 वाजता उड्डान घेतलं होतं. खराब हवामानामुळे विमानाला फोखरा एअरपोर्टवर लँड करावं लागलं होतं.
पायलटने एटीसीसोबत लँडिंगकडून परवानगी घेतली होती. पोखरा एटीसीनं लँडिंगला परवानगीही दिली होती.
विमानतळ प्रशासनानं तांत्रिक खराबीमुळे अपघात झाल्याचा संशय व्यक्त केलाय.
सिव्हिल एव्हिएशन ऑथेरिटी (CAAN)च्या मते, लँडिंगच्या आधी विमानाला आग लागली होती. त्यामुळे हवामान खराब असल्यामुळे विमान कोसळलं म्हणणं चुकीचं आहे.
एअरलाईन्सचे प्रवक्ते सुदर्शन भरतौला म्हणाले की, मृताची संख्या वाढण्याची संख्या आहे. कारण विमानाचे तुकडे तुकडे झाले आहेत.
फ्लाइट राडार24 या संकेतस्थळानुसार हे विमान 15 वर्ष जुनं होतं.
रिपोर्ट्सनुसार, प्लेन जुनं आणि नवीन विमानतळाच्या मध्येच सेती नदीच्या घाटात कोसळलं.
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी आपतकालीन बैठक बोलवली आहे. त्याशिवाय एक दिवसाचा दुखवटा जाहीर केलाय. तसेच बचावकार्य वेगात करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
भारतीय दूतावासाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी -
Helplines of Embassy:
I) काठमंडू : Diwakar Sharma:+977-9851107021
II) पोखरा : Lt Col Shashank Tripathi: +977-9856037699
दुर्घटनेचे व्हिडीओ व्हायरल
आणखी वाचा: