Shortest Flight in the World : आजवर तुम्ही जगभरात फिरण्यासाठी अनेकदा विमानाने प्रवास केला असेल. अर्थात विमानाने प्रवास म्हणजे तुम्ही साधारण एक तासांचा केला असेल. मात्र, तुम्हाला माहित आहे का जगाच्या कोपऱ्यात असाही एक प्रवास आहे जो जगातील सर्वात कमी प्रवास म्हणून उल्लेख केला जातो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा प्रवास नेमका कोणता आहे आणि हा प्रवास करण्यासाठी साधारण किती पल्ल्याचा वेळ लागतो हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर आत्ताच जाणून घ्या. 


अगदी लहान आकारांचे असतात विमान 


तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही जागा नेमकी कुठे आहे तर आम्ही स्कॉटलंडबद्दल बोलत आहोत. या ठिकाणी फक्त 80 सेकंदात म्हणजे दीड मिनिटांत हवाई प्रवास करता येतो. या ठिकाणाला ऑर्कन आयलॅंड म्हटले जाते. लोगान एअर येथे उड्डाणे चालवते आणि जवळपास 50 वर्षांपासून येथे आपली सेवा देत आहे. जर हवामान स्वच्छ असेल तर तुम्ही फक्त 47 सेकंदात वेस्ट्रेहून पापा वेस्ट्रेपर्यंत पोहोचू शकता. मात्र, इथे जेवढ्या राइड्स ऑटोमध्ये येतात, तितकाच प्रवास विमानांमध्ये केला जातो. बहुतेक पर्यटक आणि स्थानिक लोक या विमानसेवेचा लाभ घेतात.


भाड्यात सवलत मिळते 


विमानाचे भाडे महाग असते हे आपल्या सर्वांना माहित आहे, त्यामुळे तेथील सरकार लोकांना भाड्यात सवलत देते. या सवलतीला तुम्ही सबसिडी म्हणू शकता. सध्या एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जाण्यासाठी कंपन्या 17 ते 18 पौंड आकारतात. 


दोन्ही बेटांमधील अंतर फक्त 2.7 किलोमीटर 


वेस्ट्रो आणि पापा वेस्ट्रे या दोन बेटांमधील अंतर 2.7 किलोमीटर आहे. या दोघांमध्ये पूल बांधणे खूप खर्चिक आहे. वेस्टरमध्ये 600 लोक राहतात आणि सुमारे 90 लोक पापा वेस्ट्रेमध्ये राहतात. भारतातील कोणत्याही बसस्थानकावर बसेस चालवल्या जातात त्याप्रमाणे येथे विमान चालवले जाते. 


यूट्यूबर्सदेखील शेअर करतात मनोरंजक व्हिडीओ 


YouTube वर मनोरंजक फ्लाईट्सचे व्हिडीओ व्हायरल केले जातात. फ्लाइटचे इतके कमी अंतर खरोखरच रोमांचक आहे. हे जगातील सर्व YouTubers द्वारे कव्हर केले गेले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Artificial Uterus Facility द्वारे बाळाच्या डोळ्यांचा आणि केसांचा रंगही ठरवता येणार; EctoLife कंपनीचा दावा