Artificial Uterus Facility Part 2 : अॅक्टोलाइफ (EctoLife) कंपनीच्या म्हणण्यानुसार, 'आर्टिफिशियल गर्भाशय फॅसिलिटी' (Artificial Uterus Facility) या टेक्नॉलॉजीद्वारे बाळाला जन्म देता येतो. या गोष्टींची कल्पना करणं कठीण आहे. पण जर एखादी कंपनी म्हणते की, बाळाला मशीनद्वारे जन्म देताना तुमच्या मुलाची बुद्धिमत्ता किती असायला हवी? किंवा बाळाच्या डोळ्यांचा, केसांचा आणि त्वचेचा रंगसुद्धा तुम्ही ठरवू शकता. या गोष्टीवर तुमचा विश्वास बसेल का? निश्चितच बसणार नाही. मात्र, अॅक्टोलाइफ कंपनी हा दावा करते की तुम्ही बाळाच्या डोळ्यांपासून ते केसांपर्यंत सर्वच अवयव ठरवू शकता.   


कंपनीने दावा केला आहे की..


अॅक्टोलाइफ (EctoLife) कंपनीने असा दावा केला आहे की, नऊ महिने आईच्या पोटाऐवजी मशीनच्या माध्यमातून बाळाला जन्म दिला जाऊ शकतो. तसेच बाळाच्या वाढीच्या संदर्भात सर्व गोष्टी तुम्हाला ठरवता येऊ शकतात. अ‍ॅक्टोलाइफ ही कृत्रिम गर्भ सेवा देणारी जगातील पहिली कंपनी आहे असे मानले जाते. कंपनीने नुकताच या संपूर्ण प्रक्रियेची माहिती देणारा व्हिडीओ शेअर केला आहे.


कृत्रिम गर्भ म्हणजे काय?


कृत्रिम गर्भाशय म्हणजे, टेक्नॉलॉजीद्वारे तयार केलेले गर्भाशय जिथे केवळ 9 महिन्यांपर्यंतच मूल वाढवता येत नाही तर त्याबरोबर बाळाच्या जनुकांमध्येही बदल करता येतात. हे कृत्रिम गर्भाशय ठेऊन मूल जसे आईच्या पोटात राहते तशीच काळजी घेतली जाते. त्याच्या खाण्यापिण्यापासून त्याच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. ज्या कृत्रिम गर्भाशयात बाळाला ठेवले जाते त्याला ग्रोथ पॉड्स म्हणतात. मुलांना ग्रोथ पॉडमध्ये ठेवून संपूर्ण 9 महिने त्यांचे निरीक्षण केले जाते.


इच्छित मूल कसे मिळवायचे?


अॅक्टोलाइफच्या मते, कोणत्याही दाम्पत्याला या टेक्नॉलॉजीद्वारे इच्छित मूल मिळू शकते. यासाठी, कंपनीने एक एलिट पॅकेज तयार केले आहे. याला जनुकीय इंजिनिअरिंग असे म्हटले जाते. या प्रक्रियेद्वारे सामान्य मुलांच्या तुलनेत त्यांना स्पेशल बनवण्यासाठी मुलाच्या आत काही विशेष प्रकारचे डीएनए टाकले जातात. 


एवढेच नाही तर, मुलांचे जनुके बदलण्यासाठी CRISPR-Cas9 नावाचे जनुके वापरण्यात येणार आहे. या प्रक्रियेत बालकांचे 300 प्रकारचे DNA बदलले जातात. म्हणजेच, मशीनमध्ये जन्मलेल्या मुलांमध्ये विशेष जनुके टाकली जातात. या द्वारे तुम्ही तुमच्या आवडीचे मूल निर्माण करू शकता. 


Hashem Al-Ghaili कोण आहे? 


कृत्रिम गर्भाशयात मूल वाढवण्याचे संपूर्ण श्रेय ऍक्टोलाइफने हाशेम अल-घैली यांना देण्यात आले आहे. तो व्हिडीओ त्यांच्या प्रोफाईलवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये 'आर्टिफिशियल गर्भाशय फॅसिलिटी' ही टेक्नॉलॉजी सविस्तरपणे सांगण्यात आली आहे. अ‍ॅक्टोलाइफची संकल्पना आणि सुविधा ही बायोटेक्नॉलॉजिस्ट आणि सायन्स कम्युनिकेटर हसिम अल गयाली यांची आहे. 1950 पासून शास्त्रज्ञ आणि इंजीनिअरिंग या संकल्पनेवर एकत्र काम करत असल्याचा कंपनीचा दावा आहे.


पाहा व्हिडीओ : 



महत्त्वाच्या बातम्या : 


Artificial Uterus Facility : काय म्हणता..आता 'मशीन' देणार मुलांना जन्म? काय आहे नेमकं प्रकरण? वाचा सविस्तर