World Ozone Day 2022 : ओझोन दिवस हा पर्यावरणासाठी एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. लोकांना ओझोनच्या थराचे जतन करण्यासाठी शक्य ते उपाय शोधण्यासाठी ‘जागतिक ओझोन दिवस’ (World Ozone Day 2022) दरवर्षी 16 सप्टेंबरला साजरा केला जातो. वातावरणातील ओझोनचे सुरक्षा कवच राखून ठेवण्यासाठी हा दिवस लक्षवेधी ठरतो.


जागतिक ओझोन दिनाचा इतिहास (World Ozone Day History 2022) :


युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने (UNGA) 19 डिसेंबर 1994 रोजी 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन थराच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला. 16 सप्टेंबर 1987 रोजी, युनायटेड नेशन्स आणि इतर 45 देशांनी ओझोन थर कमी करणाऱ्या पदार्थांवरील मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली. मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचा उद्देश ओझोन थर कमी होण्यास जबाबदार असलेल्या पदार्थांचे उत्पादन कमी करून ओझोन थराचे संरक्षण करणे आहे. जागतिक ओझोन दिवस 16 सप्टेंबर 1995 रोजी पहिल्यांदा साजरा करण्यात आला.


ओझोन दिवस 2022 थीम


ओझोन थराचे महत्त्व आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम याबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो. या वर्षी होणाऱ्या जागतिक ओझोन दिनाची थीम 'Global Cooperation to Protect Life on Earth to encourage sustainable development.' अशी आहे.       


ओझोन थर हा ऑक्सिजन इतकाच महत्त्वाचा आहे. कारण त्यामुळेच पृथ्वीचे रक्षण होत असते. ओझोन थर सूर्यापासून उद्भवणार्‍या हानिकारक अल्ट्रा व्हायलेट किरणांपासून (The rays of the sun) पृथ्वीचे (Earth) रक्षण करतो. सूर्यापासून निघणाऱ्या या किरणांमुळे त्वचेचे अनेक आजार उद्भवू शकतात.


संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार (UNEP) 1995 सालापासून हा दिवस पाळला जातो. 1978 साली कॅनडातल्या मॉन्ट्रिअल शहरातील परिषदेमध्ये रसायनांमुळे ओझोनच्या थरावर होणा-या दुष्परिणामांबाबत उपाय करण्यासाठी अनेक देशांनी सहमती दर्शवली. हा करार पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. 


महत्वाच्या बातम्या :