World Milk Day 2023 : आज जागतिक दूध दिन (World Milk Day 2023). प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी दूध अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण दूधात सर्व प्रकारचे पोषकतत्त्व असल्याने त्याचं सेवन केलं तर त्याचा शरीराला मोठा फायदा होतो. त्यामुळे लोकांना दुधाचं महत्त्व आणि आरोग्याप्रती असलेली गरज लक्षात यावी यासाठी जागतिक अन्न आणि कृषी संशोधन परिषदेने दिलेल्या निर्देशानुसार 2001 पासून भारतासह जगभरात जागतिक दूध दिन साजरा करण्यात येतो. लोकांपर्यंत दुधाचा प्रचार आणि प्रसार करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. सर्वात पहिला दूध दिवस 1 जून 2001 रोजी साजरा करण्यात आला होता.
जागतिक दूध दिनाचा इतिहास (World Milk Day History 2023) :
2001 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने जागतिक दूध दिवसाची सुरुवात केली. या दिवसाच्या माध्यमातून लोकांना दूध आणि दुग्ध व्यवसायाचे महत्त्व पटवून द्यावे लागेल. दुधाचे अनेक फायदे आहेत आणि दुग्धजन्य पदार्थ हे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक अन्न आहे. तसेच, जगभरातील सुमारे 1 अब्ज लोक दुग्धजन्य पदार्थांच्या मदतीने कमावतात.
आज जगभरात मोठ्या प्रमाणात दुधाचं उत्पादन होत आहे. भारताने दूध उत्पादनातून जागतिक स्तरावर वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे. दरम्यान 'मिल्क मॅन' अशी ओळख असलेले वर्गिस कुरियन हे भारतातील धवल क्रांतीचे जनक आहेत. कुरियन यांनी 'अमूल'च्या माध्यमातून देशात दुग्ध क्रांती घडवली होती.
दूध पिण्याचे फायदे (World Milk Day Benefits 2023) :
दूध हा शरीरासाठी आवश्यक सर्व पोषणतत्त्वांचा अतिशय चांगला स्त्रोत आहे. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस, ऑयोडिन, आयरन, पोटॅशियम, फोलेट्स, जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ड, रायबोफ्लेविन, जीवनसत्व ब12, प्रोटीन, उत्तम फॅट इत्यादीचा समावेश असतो. दूध प्यायल्यामुळे शरीराला तातडीने ऊर्जा मिळते, कारण यात उच्च प्रतीच्या प्रथिनांसह अमिनो अॅसिड आणि फॅटी अॅसिडचा समावेश असतो.
1. दूध कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चा मुख्य स्त्रोत आहे.
2. दुधामुळे आपली हाडं मजबूत होतात.
3. व्हिटॅमिन डी मुळे आपल्या शरीरातील हार्मोन्स बॅलन्स राहतात.
4. दूध आपल्या त्वचेसाठी सर्वात गुणकारी आणि उत्तम आहे.
5. दुधामुळे हाडे फ्रॅक्चर आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांपासून बचाव होतो.
6. दूध प्यायल्याने हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका कमी होण्यास मदत होते.
7. दूध प्यायल्याने तुमचा मूड चांगला राहतो.
महत्त्वाच्या बातम्या :