World Health Day 2023 : आरोग्यामध्ये केवळ शारीरिकरित्याच नाही तर मानसिकरित्याही तंदुरूस्त असणे गरजेचे आहे. एखादी व्यक्ती जर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट असेल तर त्या व्यक्तीला निरोगी म्हटलं जातं. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार आरोग्य हे मानवी आनंद आणि कल्याणासाठी मूलभूत आहे. हे आर्थिक प्रगतीसाठी देखील महत्त्वपूर्ण योगदान देते, कारण निरोगी व्यक्ती अधिक काळ आयुष्य आनंदी जगू शकते असे म्हटलं आहे. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन (World Health Day) म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी, जगभरातील लोकांच्या सामान्य आरोग्य आणि कल्याणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.


आरोग्य ही माणसाची सर्वात अमूल्य संपत्ती मानली जाते. आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांद्वारे दरवर्षी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या सात दशकांपासून सातत्याने जगातील गंभीर आजार आणि आरोग्य संकटांचा सामना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे. 


जागतिक आरोग्य दिनाचं महत्त्व (World Health Day Importance 2023) :


जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी 7 एप्रिल रोजी आपल्या स्थापनेचा वर्धापन दिन साजरा करते. 1950 मध्ये प्रथमच जागतिक आरोग्य संघटनेने आपला वर्धापन दिन जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे, जागतिक आरोग्य संघटनेद्वारे त्याच्या स्थापनेचा वर्धापन दिन जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.


वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) 1948 मध्ये पहिली जागतिक आरोग्य सभा बोलावली. ज्यामध्ये "जागतिक आरोग्य दिन" साजरा मागणी करण्यात आली. पहिला जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल 1950 रोजी आयोजित करण्यात आला होता आणि त्यानंतर दरवर्षी त्या तारखेला साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या चिंतेचे प्राधान्य क्षेत्र हायलाइट करण्यासाठी विशिष्ट आरोग्य विषयाबद्दल जागरुकता वाढवणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.


जागतिक आरोग्य दिन 2023 थीम (World Health Day Theme 2023) :


जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यासाठी, जागतिक आरोग्य संघटनेने 1991 पासून एका थीमनुसार तो साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून दरवर्षी जागतिक आरोग्य दिन कोणत्या ना कोणत्या थीमनुसार साजरा केला जातो. यावर्षी साजरा होणाऱ्या जागतिक आरोग्य दिनासाठी सर्वांसाठी आरोग्य (World Health Day 2023 Theme- Health For All) ही थीम ठेवण्यात आली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


Important Days in April 2023 : 'एप्रिल फूल डे', 'अक्षय्य तृतीया', 'रमजान ईद'सह एप्रिल महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी