World First Cloning Sheep: आजच्याच दिवशी स्कॉटलंडच्या वैज्ञानिक एक चमत्कार केला होता. त्यांनी क्लोनिंगद्वारे एका मेंढीला जन्म दिला होता. आज याच मेंढीचा जन्मदिवशी आहे, जिचं नाव डॉली होतं. क्लोन मानवी जुळ्या मुलांसारखेच दिसतात. फरक एवढाच आहे की क्लोन विज्ञानाच्या मदतीने तयार केला जातो. तर जुळी मुले एकत्र जन्माला येतात. डॉली ही तिच्या आईची क्लोन होती. जी हुबेहुब तिच्या आईसारखी दिसत होती.


डॉलीचा जन्म कसा झाला? 


अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ क्लोन बनवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना यश येत नव्हतं. याच दरम्यान त्यांनी विचार केला की यावेळी मेंढ्यांवर प्रयोग करून पाहावा. डॉली बनवणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. 'न्यूक्लियर ट्रान्सफर' तंत्रज्ञानाद्वारे डॉलीला प्रयोगशाळेत तयार करण्यात आले. न्यूक्लियर ट्रान्सफरमध्ये दोन मेंढ्यांच्या 'सेल्स' घेण्यात आल्या. फिन डोर्सेट पांढऱ्या मेंढीच्या सेलमधून न्यूक्लियस काढून स्कॉटिश काळ्या मेंढीच्या गर्भाशयात घातली गेली. जसे एखाद्या शहराला विद्यत केंद्रातून वीज मिळते. त्याचप्रमाणे पेशीला न्यूक्लियसमधून ऊर्जा मिळते. न्यूक्लियसशिवाय पेशी मरते. स्कॉटिश काळ्या मेंढीच्या अंड्यामध्ये पांढऱ्या मेंढीचे न्यूक्लियर घातले गेले. स्कॉटिश काळ्या मेंढीच्या गर्भाशयात नवीन पेशी ठेवण्यात आली होती. जी त्याची सरोगेट आई होती. सरोगेट मदर फक्त मुलाला जन्म देते. मेंढ्यांवर 227 अयशस्वी प्रयोगांनंतर डॉलीचा जन्म 5 जुलै 1996 रोजी झाला. डॉली जन्माला आली, तेव्हा ती तिच्या आईसारखीच पांढरी होती.


डॉलीमध्ये काय होतं विशेष ?


जरी डॉलीचा जन्म काळ्या स्कॉटिश मेंढीपासून झाला होता. पण तिचा रंग सब फिन डोर्सेट मेंढ्यासारखा होता. हे घडले कारण न्यूक्लियस फिन डोर्सेट मेंढीच्या पेशीपासून घेण्यात आले होते. डीएनए न्यूक्लियसमध्ये असते, यामुळे डॉलीचा डीएनएही तिच्या आईशी जुळला. शास्त्रज्ञाने डॉलीचे बहुतेक क्लोन अनेक महिने लपवून ठेवले. ही बातमी समोर येताच सर्वत्र डॉलीची चर्चा सुरू झाली. दोन वर्षांची असताना डॉलीने बोनी नावाच्या पहिल्या कोकरूला जन्म दिला. डॉलीला एकूण सहा कोकरे होती. ज्यात दोन जुळे होते. 2001 पासून डॉली आजारी पडू लागली. ती फक्त चार वर्षांची असताना तिला सांधेदुखीचा आजार झाला. ती लंगडत चालू लागली होती. लवकरच ती इतर आजारांनीही ग्रस्त झाली. पुढे डॉलीपासून चार क्लोन तयार करण्यात आले. जे 2016 पर्यंत पूर्णपणे निरोगी होते.