World Environment Day 2022 : जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) हा दिवस म्हणजे सत्तरच्या दशकात सुरु झालेली संयुक्त राष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी जागरुकता मोहीम. वसुंधरेची चिंता असलेले, त्याची काळजी घेणारे अनेक पर्यावरणवादी घटक, संघटना, पर्यावरण प्रेमींकडून हा दिवस साजरा केला जातो. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.    


जागतिक पर्यावरण दिनाचा इतिहास (World Environment Day 2022 History) :


जागतिक पर्यावरण दिनाचा उगम 1972 मध्ये स्टॉकहोम येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवी पर्यावरण परिषदेत झाला. ही परिषद 5 जूनपासून सुरू झाली आणि 16 जूनपर्यंत चालली. तेव्हापासून जागतिक पर्यावरण दिन हा 5 जून रोजी साजरा करण्यात येतोय.  


जागतिक पर्यावरण दिनाची थीम (World Environment Day 2022 Theme) :


दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाची दरवर्षी वेगवेगळी थीम जाहीर करण्यात येते. त्यानुसार यावर्षीची थीम 'Only One Earth' अशी आहे. 


जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व (World Environment Day 2022 Importance)


पर्यावरणामुळेच आज मनुष्य, प्राणी-पक्षी, किटक यांचं जीवन शक्य आहे. पर्यावरणाशी संबंधित समस्यांना मानवी चेहरा देण्यासोबतच, लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण व्हावी हा या दिनामागचा मुख्य उद्देश आहे. लोकांमध्ये पर्यावरणाप्रति जागरुकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे आयोजित केला जाणारा जागतिक पर्यावरण दिवस हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे.



महत्वाच्या बातम्या :