Four Day Working week: सर्वसाधारणपणे पाच दिवस कामाचे आणि शनिवार, रविवार सुट्टी असा नियम आहे. त्यामुळे नोकरदारांना (Employee) शनिवार, रविवार कधी येईल असं होतं. पण आता याच नोकरदारांना 2023 मध्ये एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. 2023मध्ये आठवड्यातील चार दिवस कामाचे आणि तीन दिवस सुट्टी, असा नवा नियम बऱ्याच कंपन्या लागू करणार असल्याची माहिती मिळत आहे. 


युनाइडेट किंगडमध्ये (United Kingdom) 2022 या वर्षात आठवड्यात चार दिवस कामाचे आणि तीन दिवस सुट्टीचे हा नवा नियम लागू करण्यात आला होता. साधारणतः वर्षभर राबवण्यात आलेल्या या उपक्रमातून याचे सकारात्मक परिणाम दिसले. याचा सकारात्मक परिणाम पाहून बऱ्याच कंपन्यांनी आणि अनेक देश ही नवी कामाची पद्धत आत्मसात करुन घेण्याचा प्रयत्न आता करत आहेत. 


ही पद्धत ज्या कंपन्यांनी सुरु केली तेथील अधिकाऱ्यांनीही यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, 'या उपक्रमाचा आम्हांला हवा तसा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे'. कर्मचारी आणि कंपनी या दोघांसाठी हे नवं वेळापत्रक अगदी यशस्वी ठरल्याचा दावा देखील या अधिकाऱ्यांनी केला आहे. 


ही नवी पद्धत कशी यशस्वी ठरणार?


एकोणविसाव्या शतकात ब्रिटनमध्ये शनिवारी अर्धा दिवस आणि रविवारी कामाला सुट्टी हा नियम सुरु झाला. कर्मचाऱ्यांना कामापासून आराम मिळण्यासाठी या नियमाची सुरुवात झाली. त्यानंतर अमेरिकेत संपूर्ण शनिवार आणि रविवार असे आठवड्यातील दोन दिवस कामाला सुट्टी हा नियम लागू करण्यात आला. कामाची कायदेशीर आवश्यकता ही आधी 37 तास होती. त्यानंतर ही आवश्यकता 2002 मध्ये 34 तासांपेक्षा कमी करण्यात आली. जी आजही तशीच आहे. 


परंतु, आता चार दिवसांच्या आठवड्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवयला मिळेल. त्यामुळे ही पद्धत कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने गरजेचा असल्याचं म्हटलं आहे. तसेच ज्या कंपन्यांमध्ये चार दिवस कामाचे असतात, तिथे काम करणं कर्मचारी अधिक पसंत करतात. त्यामुळे हे कंपनीसाठीही फायद्याचे ठरते. तसेच फक्त चार दिवस ऑफीस सुरु असल्यामुळे विजेची आणि इतर गोष्टींची देखील बचत होते. ज्याचा आर्थिकदृष्ट्या फायदा कंपनीलाच होऊ शकतो. 


जशी ही पद्धत जगातल्या बऱ्याच देशात जरी सुरु झाली असली तरी भारतात मात्र या पद्धतीची सुरुवात अजून झालेली नाही. भारतात कुटुंब संस्थेला अजूनही तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे आठवड्यातील तीन दिवस जर कुटुंबासाठी मिळणार असतील तर कर्मचारी नक्कीच त्या कंपनीचा विचार करतील यात शंका नाही. त्यामुळे या पद्धतीमुळे होणाऱ्या फायद्यांचा विचार करत ही पद्धत भारतात राबवणे देखील येणाऱ्या काळात गरजेचं ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :  


Maharashtra Din: दुबईत अनोख्या पद्धतीने महाराष्ट्र दिन साजरा, luxury yacht वर ढोल ताशाचे वादन