Biggest logjam : अनेकदा आपण घराबाहेर पडलो की ट्रॅफिक जॅममध्ये अडकतो. त्यामुळे रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम (Traffic Jam) तुम्ही अनेकदा पाहिली असेल. पण तुम्ही कधी लाकडाचा जॅम (Log Jam) पाहिला आहे का? तुमचे उत्तर 'नाही' असेच असेल. लाकडाच्या जॅमला 'लॉगजॅम' म्हणतात. अलिकडील काही संशोधनानंतर, तज्ज्ञांना जगातील सर्वात मोठा लॉगजॅम (लाकडांची कोंडी) सापडला आहे आणि तिथे टनांहून अधिक कार्बनचे भांडार देखील आहे. ते कुठे आणि कसे साठले ते जाणून घेऊया...


इतका मोठा लॉगजॅम झाला तरी कसा?


सायन्स अलर्ट वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, कॅनडातील नुनावुत (Nunavat, Canada) येथील मॅकेन्झी नदी डेल्टा (Mackenzie River Delta) जवळ हा महाकाय लॉगजॅम आढळून आला. हा जॅम 51 स्क्वेअर किलोमीटरवर पसरलेला आहे. झाडांच्या खोडांनी आणि लाकडांनी हा संपूर्ण परिसर भरलेला आहे. वास्तविक, मॅकेन्झी नदीच्या आजूबाजूच्या जंगलातून ही झाडं नदीत येतात. अशा परिस्थितीत नदी जिकडे वळते, तिथेच ती वाढू लागतात. यासोबतच नदीच्या पात्रात ते एकत्र येऊन सर्वत्र पसरतात.


किती कार्बन आहे जमलेला?


शेकडो वर्षांपूर्वी ही झाडं सुकून नदीत पडली असावीत. या ठिकाणी दूरदूरपर्यंत फक्त लाकडंच साचलेली आहेत. संशोधकांच्या मते, इथे 3.4 दशलक्ष टन कार्बन साचला आहे.
हवामान बदलाच्या दृष्टीनेही ते अत्यंत धोकादायक आहे. यामुळे कार्बन पूल तयार होऊ शकतो. एका वर्षात 25 लाख गाड्या जितका कार्बन उत्सर्जित करतात, तितका कार्बन या लॉगजॅममध्ये पसरलेला असू शकतो.


हजारो वर्षे जुनी असू शकतात लाकडं


युनिव्हर्सिटी ऑफ लॉसनेचे शास्त्रज्ञ व्हर्जिनिया रुईझ व्हिलानुएवा यांच्या मते, आतापर्यंत फक्त कार्बनच्या प्रवाहावर संशोधन झाले आहे, लॉगजॅम म्हणजेच साचलेल्या लाकडांवर संशोधन होणे बाकी आहे आणि लाकडांच्या संशोधनावरही काम वेगाने सुरु आहे. अहवालानुसार, आर्क्टिक्टमध्ये तापमान खूप कमी आहे आणि हवामानातील आर्द्रताही खूप कमी आहे, ज्यामध्ये लाकडं खूप काळापर्यंत टिकून राहतात. अशा परिस्थितीत शेकडो वर्षांपासूनचे अवशेष येथे सहज पाहायला मिळतात.


अंदाजापेक्षा जास्त असू शकतो कार्बनचा साठा


या लॉगजॅमचा आकार जवळपास 20 अमेरिकन फुटबॉल मैदानांएवढा (American Football Ground) आहे, ज्यामध्ये 7,300 टन कार्बनचा साठा आहे. आकाशातून दिसणारे लाकडी ओंडके पाहून 34 लाख टन कार्बन असल्याचा अंदाज लावला जात आहे. शास्त्रज्ञांचा दावा आहे की, अनेक लाकडी ओंडके पाण्याखाली किंवा जमिनीतही गाडले जाऊ शकतात.


महत्त्वाच्या बातम्या:


Twitter: ट्विटर आता प्रकाशकांना प्रत्येक लेखावर शुल्क आकरण्याची परवानगी देणार, एलॉन मस्क यांची घोषणा