Rosy Zhao Viral Video : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. याचं कारण म्हणजे या अभिनेत्रीची तब्येत अचानक इतकी खराब झाली की, तिला चालता-बोलता आणि खाताही येईना. प्रसिद्ध चीनी अभिनेत्री झाओ लुझी हिची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तिचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले, ज्यामध्ये ती गंभीररित्या आजारी असल्याचं स्पष्ट दिसत होतं. मीडिया रिपोर्टनुसार, ही अभिनेत्री एक दिवस अचानक सेटवर चक्कर येऊन कोसळली. तिला अशक्तपणामुळे चक्कर आल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, नंतर समोर आलं की तिच्या बॉसकडून तिच शारीरिक आणि मानसिक शोषण झाल्यामुळे तिची तब्येत इतकी बिघडली. ही माहिती समोर येताच चाहत्यांना मोठा धक्का बसला.
प्रसिद्ध अभिनेत्रीला बॉसकडून बेदम मारहाण
चिनी अभिनेत्री झाओ लुझी आरोग्य संबंधित अडचणींचा सामना करत आहे. अलिकडेच, झाओ सेटवर अचानक आजारी पडल्यानंतर ती चर्चेत आली. सुरुवातीला तिच्या प्रकृतीची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती, पण नंतर तिचा व्हीलचेअरवरील व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार, झाओला नैराश्य आणि अॅफेसियाचा त्रास असल्याचे आढळून आले. तिच्या बॉसकडून तिला मारहाण झाल्याचंही समोर आलं. सध्या झाओने तिच्या सर्व कामांतून ब्रेक घेतला असून ती बरी आरोग्यावर लक्ष केंद्रीत करत आहे.
चालता-बोलताही येईना, व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
26 वर्षीय अभिनेत्रीची दयनीय अवस्था
चायनीज ड्रामा स्टार झाओ लुसीला तातडीने रुग्णालयात नेण्यात येत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली. कामाचं प्रेशर आणि व्यस्त शेड्युलमुळे 26 वर्षीय अभिनेत्रीची ही अवस्था झाल्याचं बोललं जात होतं. व्हिडीओमध्ये व्हीलचेअरवर बसलेली अभिनेत्री अशक्त असल्याचं स्पष्ट दिसत होतं. तिने मास्क आणि टोपीने तिचा चेहरा लपवला होता.
बाथरुममध्ये बंद करुन मध्यरात्रीपर्यंत शोषण
अभिनेत्रीच्या जवळच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार, झाओला तिच्या जुना बॉस केयू एजन्सीच्या सीईओकडून मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला. एका रात्री तिच्या बॉसने तिला मध्यरात्री 2 वाजेपर्यंत बॉथरुममध्ये मारहाण केली. झाओ एका ऑडिशनसाठी बीजिंगमधील एका मैत्रिणीच्या घरी राहत होती. एक दिवस ती घरी परतली, तेव्हा ती खूप घाबरलेली दिसत होती. काय झालं असं विचारल्यावर तिने सांगितलं की, तिला ऑडिशनचा रोल न मिळाल्याने तिच्या बॉसने तिला शिवीगाळ केली. तिला बाथरूममध्ये केस ओढून बेदम मारहाण केली. अभिनेत्रीसोबत झालेल्या घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, आता हळूहळू तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.