- पहिला दावा- रशियाच्या सेचेनोव यूनिव्हर्सिटीने दावा केला आहे की त्यांनी क्लिनिकल ट्रायल पूर्ण केलं आहे
- दुसरा दावा- चीनी कंपनी सायनोवॅकचा दावा आहे की, त्यांच्या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरु आहे
- तिसरा दावा- ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजमध्ये ट्रायल करतेय
- चौथा दावा- कॅनसिनो बायोलॉजिक्सचा फेज-2 ट्रायल पूर्ण झालं आहे.
- पांचवा दावा- मॉडर्ना या अमेरिकन कंपनीनं फेज-2 ट्रायल पूर्ण केलं आहे.
Corona Vaccine | कोरोनावरील लसीचा शोध कुठवर? जाणून घ्या जगातील सर्वात मोठ्या पाच संशोधनाबद्दल
एबीपी माझा वेब टीम | 16 Jul 2020 03:54 PM (IST)
जगातील अनेक देश कोरोनावर लस (Corona vaccine)बनवल्याचा दावा करत आहेत. यातील सर्वात मोठे पाच दावे आहेत, जे कोरोना लसीच्या संशोधनात आघाडीवर असल्याचं मानलं जात आहे.
नवी दिल्ली: कोरोनावर मात करण्यासाठी लस किंवा औषध कधी येणार? हा सवाल आता लोकांच्या समोर आहे. कारण कोरोनावर आता एकमेव उपाय म्हणजे त्यावर औषध येणं हाच मानला जात आहे. जगभरात सध्या 200 हून अधिक कंपन्या कोरोना व्हायरसवर औषध तसंच लस शोधण्याचं काम करत आहेत. भारतात देखील 30 कंपन्या कोरोनावर लस बनवल्याचा दावा करत आहेत. जगातील अनेक देश कोरोनावर लस बनवल्याचा दावा करत आहेत. यातील सर्वात मोठे पाच दावे आहेत, जे कोरोना लसीच्या संशोधनात आघाडीवर असल्याचं मानलं जात आहे.