NASA Astronomy Picture of Sun : सूर्याचा (Sun) रंग कोणता आहे? असा प्रश्न कुणी विचारला तर यावर स्पष्ट उत्तर असतं पिवळा. पण तुम्हाला कुणी सांगितलं की सूर्याचा रंग पिवळा नसून वेगळाच आहे, तर... ? नासाने नुकताच सूर्याचा एक फोटो शेअर केला आहे. यावरून सूर्याचा खरा रंग कोणता असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 11 जून 2023 रोजी नासाने सूर्याचा फोटो शेअर केला आहे. यावरून सूर्याचा खरा रंग कोणता याबाबत चर्चा रंगली आहे. नासाने शेअर केलेल्या खगोलशास्त्रीय फोटोमध्ये (NASA Astronomy Picture of the Day) सूर्याचे विस्तृत रंगाचे स्पेक्ट्रम दिसत आहेत. 


सूर्याचा खरा रंग कोणता?


नासाने शेअर केलेल्या फोटोमध्ये सूर्याचा खरा रंग पिवळा किंवा पांढरा नसून वेगळाच दिसत आहे. यावरून एक गोंधळ उडाला आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाच्या (NASA) मते, आपल्या डोळ्यांना दिसणारा रंग विविध घटकांनी प्रभावित होतो. यामध्ये उत्सर्जित होणाऱ्या प्रकाशाचा तरंग, त्याची लांबी आणि तीव्रता, पर्यावरणीय परिस्थिती, प्रकाश, आपल्या डोळ्यांची क्षमता आणि आपल्या मेंदूचे कार्य यांचा समावेश होतो.


पाहा नासाने शेअर केलेला फोटो


नासाने शेअर केला सूर्याचा फोटो 


नासाने सांगितलं आहे की, सूर्याचा हा फोटो हा प्रत्यक्ष सूर्याचा रंग वर्णपट (NASA Astronomy Picture of the Day) आहे. नासाने शेअर केलेल्या फोटोमध्ये सूर्याचा वर्णपट म्हणजे स्पेक्ट्रम (Spectrum) दिसत आहे. यामध्ये सूर्यप्रकाशाद्वारे उत्सर्जित केलेल्या रंगांची संपूर्ण श्रेणी दिसत आहे. जेव्हा सूर्यप्रकाश प्रिझम (काचेची त्रिकोणाकृती घन आकाराची वस्तू) मधून जातो, तेव्हा अशाप्रकारे विविध रंग दिसतात असं नासाने सांगितलं आहे.


नासाचं स्पष्टीकरण


हे स्पेक्ट्रम मॅकमॅथ-पियर्स सोलर ऑब्झर्व्हेटरीमध्ये तयार केले गेले आहे. नासाच्या मते सूर्य पांढऱ्या रंगाचा दिसतो आणितो जवळजवळ सर्व रंगांमध्ये पसरलेला प्रकाश उत्सर्जित करतो. यामध्ये सूर्य प्रामुख्याने पिवळ्या आणि हिरवा रंग असल्याचं नासाने स्पष्ट केले. स्पेक्ट्रममध्ये दिसणारे गडद ठिपके सूर्याच्या पृष्ठभागावर किंवा त्याच्या वर उपलब्ध असलेल्या वायूंद्वारे सूर्यप्रकाशाचे शोषण झाल्यामुळे होतात. 


आपल्याला सूर्य पिवळ्या रंगाचा का दिसतो?


पृथ्वीवरील वातावरणाचा सूर्याच्या रंगावर लक्षणीय प्रभाव पडतो. सूर्यप्रकाश वातावरणातून जात असताना, प्रकाशाचं सूर्यापासूनच अंतर यामुळे  प्रभावीपणे विखुरला जातो.  डोळ्यांची क्षमता याचा प्रभाव पडतो. आपल्या वातावरणातून जाणार्‍या दृश्यमान प्रकाशाच्या तरंगाची लांबी कमी होते, ज्यामुळे आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचणारा प्रकाश काही प्रमाणात रोखला जातो. या बदलामुळे मेंदूच्या स्पेक्ट्रमनुसार, सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला सूर्य पिवळ्या रंगात दिसतो.