Vladimir Putin Apologizes : कजाकिस्तानमधील विमान अपघाताबाबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी माफी मागितली आहे. रशियाचं हवाई सुरक्षा दल युक्रेनच्या हल्ल्याला जशाचं तसं उत्तर देत असताना तेव्हा ही दुर्घटना घडली. ही घटना अतिशय दु:खद असल्याचं रशियाने म्हटलं आहे. यापूर्वी रशियन एअर स्पेसमध्ये मोठा हस्तक्षेप झाला आणि त्यानंतर विमान कोसळलं,असं अजरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम एल्हिव यांनी व्लादिमीर पुतीन यांना सांगितलं होतं.
कजाकिस्तानमधील विमान अपघातात 38 जणांचा मृत्यू
या अपघातात 38 जणांचा मृत्यू झाला. अझरबैजानची राजधानी बाकू येथून बुधवारी उड्डाण केले होते. हे विमान ग्रोझनीकडे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, टेकऑफनंतर काही वेळातच त्याचा मार्ग बदलण्यात आला आणि कझाकस्तानमध्ये उतरण्याच्या प्रयत्नात विमान कोसळले. या अपघातात 38 जणांचा मृत्यू झाला असून 29 जण जखमी झाले आहेत.
रशियाने निवेदन काढून मागितली माहिती
रशियन राष्ट्राध्यक्ष कार्यालय 'क्रेमलिन'ने शनिवारी अधिकृत निवेदन जारी केले. या निवेदनातून सांगण्यात आले की, 25 डिसेंबर रोजी युक्रेनियन ड्रोन हल्ल्यामुळे रशियाच्या ग्रोझनीजवळील हवाई संरक्षण यंत्रणांनी गोळीबार केला. मात्र, या गोळीबारावेळी अचानक हे विमान समोर आले. त्यामुळे या गोळ्या विमानावर झाडल्या गेल्या.
खासदार रसीम मुसाबेकोव्ह यांनी विमानासाठी रशियाला जबाबदार धरले होते
या आठवड्याच्या सुरुवातीला, जेव्हा एक अजरबैजानी विमान कझाकस्तानच्या दिशेने जाण्यापूर्वी उतरण्याच्या प्रयत्नात क्रॅश झाले, तेव्हा एक युक्रेनियन ड्रोन चेचन्या प्रदेशात हल्ला करत होते, असं व्लादिमीर पुतीन यांनी माफी मागण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 27 डिसेंबर रोजी, रशियाच्या विमान वाहतूक प्रमुखाने सांगितले होते. अझरबैजान, कझाकस्तान आणि रशियामधील अधिकाऱ्यांनी घटनेचा संपूर्ण तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत अपघाताच्या संभाव्य कारणाविषयी माहिती दिली नव्हती. परंतु अजरबैजामधील खासदार रसीम मुसाबेकोव्ह यांनी या अपघातासाठी मॉस्कोला जबाबदार धरले होते. जे आता खरे ठरले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या