हाँगकाँग : जगभरातील लोकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावाची माहिती चीनला आधीपासून होती. मात्र, जिनपिंग प्रशासनानं वरिष्ठ पातळीवरच हे सगळं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप ली मेंग यान या वरिष्ठ व्हायरॉलॉजिस्टनं केला आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या एक्स्क्लुझिव मुलाखतीत त्यांनी चीनच्या खोटारपडेपणाचा बुरखा फाडला.


ली मेंग यान या विषाणूतज्ज्ञ आणि प्रतिकारशक्तीशास्त्रात तज्ज्ञ आहेत. त्या हाँगकाँगच्या सार्वजनिक आरोग्य विभागात काम करत होत्या. काहीच दिवसांपूर्वी ली मेंग यान यांनी चीन सरकारच्या दडपशाहीचा विरोध करत अमेरिका गाठली आहे. चीनला कोरोनाबाबतची माहिती जगाला कळू द्यायची नव्हती. त्यामुळेच या विषयात आम्ही करत असलेलं संशोधन आणि निरीक्षणं याकडे वरिष्ठांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केलं. इतकंच नव्हे तर या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अभ्यासामुळे लाखोंचे प्राण वाचू शकले असते, पण चीन सरकारनं त्याकडे कानाडोळा केला.


चीनमधील कोरोनाच्या केसेसचा अभ्यास करण्यावरही मनाई घातली होती
कोरोनावर संशोधन करणाऱ्या जगातील पहिल्या काही मोजक्या शास्त्रज्ञांपैकी आपण एक असल्याचा दावा यान यांनी केला आहे. इतकचं नाही तर त्या ज्या प्रयोगशाळेत काम करायच्या तिथले वरिष्ठ डॉ. लिओ पून यांनी सार्समधील अतिविषम सार्सच्या क्लस्टरबाबत अभ्यास करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. विशेष म्हणजे काहीच दिवसात याच सार्सच्या अर्थात कोरोनाचे रुग्ण चीनमधून आढळून आले होते. त्यानंतर चीन सरकारनं हाँगकाँगसह इतर देशातील तज्ज्ञांना चीनमधील कोरोनाच्या केसेसचा अभ्यास करण्यावरही मनाई घातली होती, असा दावा यान यांनी केलाय.


कोरोनापाठोपाठ चीनमध्ये ब्युबॉनिक प्लेगच्या प्रसाराची भीती, उत्तर मंगोलियात दोन बाधित आढळले


तर मी कायमची गायब झाले असते
आम्ही त्याबाबत बोलू शकत नव्हतो. पण आम्हाला मास्क वापरणं गरजेचं होतं. काहीच दिवसात माणसांमधून होणारा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागला. अखेर मी हाँगकाँग सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मी एका बॅगपॅकसह तिथून निघाले. 28 एप्रिलला सेन्सर्स आणि व्हिडीओ कॅमेऱ्यांचा ससेमिरा चुकवून थेट कॅथे पॅसिफिक फ्लाईट घेतली आणि अमेरिका गाठली. एक पर्स आणि पासपोर्ट वगळता अनेक जिवलग गोष्टी तिथेच सोडून यावं लागलं. जर मी पकडले गेले असते तर मला जेलमध्ये टाकून दिलं असतं. किंवा मी कायमची गायब झाले असते. सध्या हाँगकाँग विद्यापीठानं यान यांचे वेबपेज बंद केलं असून त्यांचा ई-मेल आयडीही डिअॅक्टिवेट केला आहे.


India China Border Issue | भारत-चीनमध्ये संयुक्त सचिव स्तरावर महत्त्वपूर्ण बैठक