न्यूयॉर्क: अनेक शब्द असे असतात की जे आपल्याला बोलताच येत नाहीत, ते बोलण्याच्या नादात आपण दुसरंच काहीसं बोलून जातो आणि आपलं हसं करुन घेतो. यातून महासत्ता असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडनही (Joe Biden) सुटले नाहीत. अमेरिका म्हणजे काय हे एकाच शब्दात स्पष्ट करण्याच्या नादात ज्यो बायडन काहीतरी वेगळंच बोलले. या संबंधिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून तो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. 


किम डॉटकॉम (Kim Dotcom) नावाच्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ज्यो बायडन यांच्या बाजूला उपराष्ट्रपती कमला हॅरिस या देखील दिसतात. 


काय आहे व्हिडीओ? 
ज्यो बायडेन म्हणाले की, अमेरिका एक असं राष्ट्र आहे की जे एकाच शब्दामध्ये स्पष्ट करता येऊ शकते. असं बोलताना तो शब्द बायडन उच्चारतात, Asufutimaehaehfutbw... अर्थात बायडेन यांना तो शब्द नीट उच्चारता येत नाही, त्याची जिभ जड होते.  


 






हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून हा व्हिडीओ आतापर्यंत 40 लाखाहून जास्त लोकांनी पाहिला आहे. तर 36 हजाराहून जास्त लोकांनी त्याला लाईक  केलं आहे. तसेच आठ हजाराहून जास्त लोकांनी रीट्वीट केलं आहे. त्यावर अनेक कमेंट येत असून त्यामध्ये बायडेन यांची खिल्ली उडवली जात आहे. काही लोकांनी तर बायडन यांचं वय झालं असून त्यामुळे हा प्रकार घडल्याचं कमेंटमध्ये सांगितलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: