Covid Cases in Russia: देशात जीवघेण्या कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पण कोरोनाचा जगभरातून कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही. रशियामध्ये (Russia) कोरोनाचा प्रदुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात 11 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
रशियामध्ये कोरोनाचा प्रदुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात 11 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊन लावण्यात आलाय. गेल्या 24 तासात 40 हजार 96 नवीन रुग्णांची नोंद झालीय, तर 1 हजार 159 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रशियात केवळ 32 टक्के जनतेचं लसीकरण झालं आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
रूसमध्ये मंगळवारी कोरोनामुळे 1106 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे रशियाने नागरिकांना या आठवड्यात वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. महामारीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी अगोदर 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत संचारबंदी लागू केली होते. या दरम्यान जास्तीत लोकांना वर्क फ्रॉम होम आणि अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांना लस न घेतलेल्या 60 वर्षावरील अधिक नागरिकांनी घरी राहण्याचे निर्देश दिले आहे.
Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 16 हजार नवे कोरोनाबाधित, 733 रुग्णांचा मृत्यू
ब्रिटनमध्ये काल 43 हजार 941 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
ब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. ब्रिटनमध्ये काल 43 हजार 941 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तरुणांमध्ये अँटीबॉडीज वाढत आहेत, मात्र वृद्धांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.