मुंबई : सोशल मीडियावर लोक काय चॅलेन्ज देतील काही सांगता येत नाही. महत्वाचं म्हणजे असं चॅलेन्ज स्वीकारणाऱ्यांचा भरणाच सोशल मीडियावर पडून असतो. आता हेच बघा ना, Buitengebieden ने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे आणि त्यामध्ये लपलेल्या मांजराचा शोध घेण्याचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान सोपं जरी वाटत असलं तरी भलेभले त्यापुढे गारद झालेत पण त्यातलं मांजर काही सापडत नाही. 

Buitengebieden ने ट्विटरवर एक काळ्या रंगाचा दरवाजा असलेला फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये एक मांजर असून ते शोधा असं आव्हान दिलं आहे. तसं पाहता अनेकांना हा टास्क अतिशय साधा वाटतोय. 

 

या दरवाज्याला काचेची तावदान असल्याचं दिसतंय. कदाचित त्यामध्ये हे मांजर लपल्याचं अनेकांनी म्हटलंय. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एकटंच हे चॅलेन्ज स्वीकारलंय तर चुकीचं आहे. या फोटोला आतापर्यंत जवळपास सात हजार लाईक्स आल्या आहेत तर साडेतीनशेच्या जवळपास कमेन्ट आल्या आहेत. 

 

या ट्वीटमध्ये सर्वात मजेशीर काय असेल तर लोकांच्या कमेन्ट्स. ज्या लोकांना या चित्रात मांजर सापडलं नाही त्यांनी इतर ठिकाणच्या मांजरांचा फोटो टाकला आहे. 

 

तुम्हीही हे चॅलेन्ज स्वीकारा आणि बघा... या चित्रात मांजर सापडतंय का ते.

महत्वाच्या बातम्या :