Lily Zaremba Success Story: लिली झारेम्बा नावाची 21 वर्षाची तरूणी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. लिलीने तिच्या वयाच्या 19 व्या वर्षी शिक्षण सोडले. त्यानंतर काही दिवसांनी नोकरीही सोडली. मात्र, तरीही लिली दरमहा 50 लाखांची कमाई करीत आहे. हे ऐकल्यानंतर सर्वानांच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एवढेच नव्हेतर, तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रत्येक उस्तुक झाले आहे. लिलीने गेल्या काही दिवसांपूर्वी टिक-टॉकवर तिची सक्सेस स्टोरी सांगितली होती. ती कशापद्धतीने दर महिन्याला 50 लाख कमवते? याची माहिती तिने दिलीय.


एका अहवालानुसार, लिलाचा मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. लिलीनं 19व्या वयात शिक्षण सोडून एका रेस्टॉरंटमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिनं या रेस्टॉरंटमध्ये साफसफाईचेही कामे केलंय. त्यानंतर तिने ही नोकरी सोडली. या काळात लिलीला आर्थिक शिक्षण कंपनीची माहिती मिळाली. लिलीने या कंपनीकडून गुंतवणूक करण्याचे मार्गदर्शन घेतलं. ज्यामुळे लिलीचे संपूर्ण आयुष्य बदलून गेलं.


नोकरीबरोबर गुंतवणुकीची कला शिकली


नोकरी सोडल्यानंतर लिलीने स्टॉक, क्रिप्टो मार्केट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इत्यादींमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. यादरम्यान तिने अनेक लोकांना गुंतवणुकीची कला शिकवून भरपूर पैसा कमावला. त्यानंतर तिनं हा व्यवसाय बनवला. ती आज केवळ कमिशनच्या जोरावर अलिशान जीवन जगते. लिली लोकांना गुंतवणूकीच्या टीप्स देते आणि त्यांच्याकडून कमिशन घेते. ती स्वतःही गुंतवणूक करते आणि नेटवर्क मार्केटिंग करते.


वयाच्या 21 व्या वर्षी 1 दशलक्ष डॉलर्सची मालक


आपल्या यशाबद्दल बोलताना लिलीने असे सांगितले की, तिनं दोन वर्षात खूप मेहनत घेतली. या काळात तिला अनेक चढ-उतार पाहावं लागलं. आज ती दरमहा 53 लाखांची कमाई करते. एवढंच नव्हेतर, वयाच्या 21 व्या वर्षी ती 1 दशलक्ष डॉलर्सची मालक आहे. 


जीवनात योग्य मार्गदर्शक मिळणे गरजेचे


लिलीने टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये असे म्हंटले आहे की, प्रत्येकाने त्यांच्या कौशल्यानुसार काम केले पाहिजे. प्रत्येकाने आयुष्यात योग्य मार्गदर्शन घेतले पाहिजे. दरम्यान, अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घ्या. त्यांच्यासारखे कठोर परिश्रम करा. अशाप्रकारे लवकरच यश प्राप्त करता येऊ शकते. प्रत्येकाने ऑनलाईन कमाईचे साधन शोधले पाहिजे. तुम्ही एफिलिएट मार्केटिंग, फॉरेक्स आणि क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करून अधिक जलद कमवू शकता, असेही लिलीन म्हटले आहे. लिलीला टिक टॉकवर 2 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. तसेच तिला आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.