NeoCov coronavirus: कोरोनाचा आणखी एक व्हेरियंट आता समोर आला आहे. निओकोव्ह (Neo Cov) असं या व्हेरियंटचं नाव आहे. सध्यातरी हा प्राण्यांमध्ये आढळत असल्याने चिंता तशी कमी आहे, पण या व्हेरियंटचा मनुष्यांमध्ये प्रादुर्भाव झाल्यास तीन पैकी एका रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो, असं चीनच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. दरम्यान या विषाणू विरोधात कोरोनाची लस कितपत प्रभावी आहे, याबाबत bioRxiv या वेबसाईटने माहिती दिली आहे.


दरम्यान या निओकोव्ह व्हेरियंटविरोधात सध्या असणारी कोरोनाची लस अधिक प्रभावी नसल्याचं या वेबसाईटने म्हटलं आहे. दरम्यान या विषाणूबाबतचा संपूर्ण अभ्यास अजून शिल्लक असला तरी सध्या समोर येणाऱ्या माहितीनुसार सध्यातरी लशीतील घटक या व्हेरियंटपासून मनुष्यांचं रक्षण करण्यासाठी अपुरे आहेत. दरम्यान हा व्हेरियंट सध्या प्राण्यांमध्ये अधिक फैलावत असून माणसांमध्ये याचा वेगवान प्रादुर्भाव अजून सुरु झाला नसल्याने याबाबत अभ्यास अजूनही सुरु आहे.


टास्क फोर्स सदस्यांकडून न घाबरता काळजी घेण्याचे आवाहन


टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी या निओकोव्ह व्हेरियंटबाबत ट्वीट करत न घाबरता काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. हा व्हेरियंच नवीन नसून याआधीही याचे रुग्ण आढळले आहेत. तसंच हा व्हायरस वटवाघळांमध्ये अधिक आढळत असून मनुष्यांमध्ये सध्यातरी अधिक आढळत नसल्याने न घाबरता काळजी घ्यावी असं ट्वीट करत म्हटलं आहे.


 


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha