पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचा नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. शनिवारी आणि रविवारी लोकांनी रस्त्यावर उतरुन जाळपोळ केली. आंदोलन आणि जाळपोळ करणाऱ्या 412 नागरिकांना फ्रान्स पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन सुरु होते. परंतु शनिवारी या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. त्यामुळे फ्रान्स सरकार सध्या आणीबाणी लागू करण्याचा विचार करत आहे.
पॅरिसमधल्या तरुणांनी या आंदोलनात मास्क घालून वाहने आणि इमारतींची जाळपोळ केली. तसेच पोलिसांच्या गाड्याही जाळल्या. या आंदोलनात अत्तापर्यंत फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये तब्बल 133 जण जखमी झाले आहेत, तर फ्रान्स शहरात एकूण 263 लोक जखमी झाले आहेत, त्यात 23 पोलिसांचा सामावेश आहे. फ्रान्समध्ये वाढत्या महागाईविरोधात अनेक दिवसांपासून 'यल्लो वेस्ट मूव्हमेंट' या नावाने आंदोलने सुरु होती. या आंदोलनांचे शनिवारी दंगलीत रुपांतर झाले.
या आंदोलकांनी दक्षिण फ्रान्समध्ये बिल भरणा केंद्र पेटवून दिले. फ्रान्सच्या उत्तर आणि दक्षिण महामार्गावर आंदोलकांनी चक्का जाम केले. या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी धुरांची कांडी देखील फोडली मात्र आंदोलकांची आक्रमक भूमिका ठाम राहीली. आंदोलकांनी जाळपोळ चालूच ठेवली.
या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर अखेर फ्रान्स सरकारने त्याची दखल घेतली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी याबाबत बैठक बोलावली. मॅक्रॉन यांनी देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांशी सुरक्षाविषयक चर्चा केली.
फ्रान्समध्ये परतल्यानंतर मॅक्रॉन यांनी अर्जेंटिनाच्या ब्युनोस आयर्स येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मॅक्रॉन यांनी हिंसाचार खपवून घेणार नाही, असे आंदोलकांना खडसावून सांगितले.
पेट्रोल-डिझेलवरील करवाढीमुळे फ्रान्स पेटलं, सरकारचा आणीबाणीचा विचार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Dec 2018 01:23 PM (IST)
फ्रान्समध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचा नागरिकांनी तीव्र विरोध करत हिंसक आंदोलन केले. देशभरातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून फ्रान्स सरकार आता आणीबाणीचा विचार करत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -