मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट कायमचे निलंबित करण्याचा अभूतपूर्व निर्णय घेण्यात आला आहे. या कारवाई मागे ट्विटर मायक्रोब्लॉगिंग साईटच्या भारतीय वंशाच्या सर्वोच्च वकील विजया गड्डे यांची प्रमुख भूमिका होती. युएस कॅपिटलवर ट्रम्प समर्थकांकडून करण्यात आलेल्या अभुतपूर्व गोंधळ आणि त्यानंतर झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमुळे अशाच प्रकारची कोणतीही घटना भविष्यात घडू नये, यासाठी पुढील काळाबाबतची सावधगिरी म्हणून ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
हैदराबादमध्ये जन्मलेल्या 45 वर्षीय विजया गड्डे हे ट्विटर लॉ, पब्लिक पॉलिसी तथा ट्रस्ट आणि सिक्युरिटीचे प्रमुख आहेत. शुक्रवारी गड्डे यांनी ट्वीट करत म्हटलं की, ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट पुढील हिंसाचाराच्या जोखमीमुळे कायमचे निलंबित करण्यात आले आहे. जेव्हा ट्रम्प यांचे अकाऊंट निलंबित केले गेले तेव्हा त्याचे 8.87 कोटी फॉलोअर्स होते आणि ते स्वतः 51 जणांना फॉलो करायचे.
डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी निलंबित
विजया गड्डे 2011 मध्ये या ट्विटरसोबत जोडल्या गेल्या होत्या. त्याआधी त्या अमेरिकन कंपनी जुनिपर नेटवर्कमध्ये वरिष्ठ कायदा संचालक होत्या. त्यांनी न्यूयॉर्क लॉ युनिव्हर्सिटी स्कूलच्या विश्वस्त मंडळावरही काम केले आहे. त्याचे बालपण टेक्सास आणि न्यू जर्सीमध्ये गेले.
पराभवाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी अण्वस्त्र हल्ला करण्याचे आदेश दिले तर? अमेरिकेत चिंता वाढली
डोनाल्ड ट्रम्पच्या हजारो समर्थकांनी बुधवारी कॅपिटल बिल्डिंगवर (यूएस संसद भवन) हल्ला केला आणि पोलिसांशी चकमक झाली. या घटनेत काही लोकांचा मृत्यूही झाला होता. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटही बंद करण्यात आले आहेत. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी सांगितलं की, अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधीपर्यंत देशाचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंट ते वापरु शकणार नाहीत.
US Capitol Violence | डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई?, जो बायडन म्हणाले...