Kamala Harris Covid 19 : अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरीस (Kamala Harris) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे. हॅरीस यांचे कोरोनाचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. कॅलीफोर्नियावरून परतल्यावर हॅरीस यांना कोरोनाची लागण झाली आहे.


कमला हॅरिस यांची कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कमला हॅरीस यांना कोणतीही लक्षणे नाहीत. कोरोनाचा अहवाल आल्यानंतर आयसोलेट केले आहे. त्या पुढील काही दिवस घरातून काम पाहणार असल्याची माहिती सचिवांनी दिली आहे. हॅरीस या गाईडलाईनचे पालन करणार आहे. 


हॅरिस या मंगळवारी सकाळी कॅलीफोर्नियावरून व्हाईट हाऊसला आल्या. व्हाईट हाऊसला आल्यानंतर त्यांनी चाचणी केली. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या तातडीने घरी गेल्या. त्यांनी आपल्या घरीच स्वत:ला आयसोलेट केले आहे. हॅरीस यांचे कोरोनाचे दोन्ही डोस जानेवारी महिन्यात पूर्ण झाले आहे. पहिला बूस्टर ऑक्टोबर महिन्यात आणि दुसरा बूस्टर डोस 1 एप्रिल महिन्यात दिला.


राष्ट्रपती बायडन यांना धोका नाही


व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती जो बायडन कमला हॅरिसच्या संपर्कात आले नाहीत. त्यामुळे काळजी घेण्याचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसात हॅरीस ज्यांना भेटल्या त्यांना टेस्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हॅरिस यांना कोणतीही कोरोनाची गंभीर लक्षणे नाहीत 


गेल्या काही आठवड्यात अमेरिकेतील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. BA.2 व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. तसेच मृतांचा आकडा देखील ३०० च्या पुढे आहे. कोरोनाची आकडेवारी पाहता सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. व्हाईट हाऊसने काही दिवसापूर्वी ट्विट करत अॅक्शन प्लान संदर्भात माहिती दिली होती. ज्यामुळे कोरोना रुग्णांना उपचार घेण्यास मदत होईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :