Corona Update : देशात अनेक आठवड्यांच्या दिलाशानंतर पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे काही राज्यांनी पुन्हा एकदा कोरोनाविरोधात पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटक सरकारने देखील नागरिकांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे.


कर्नाटक सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आता लोकांना सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासादरम्यान मास्क घालणे बंधनकारक असेल. तसेच सार्वजनिक ठिकाणी कोणी थुंकताना आढळून आल्यास त्याला दंड आकारण्यात येणार आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता आलेख पाहता सरकारने हा निर्णय घेतला आहे.


दिल्लीतही निर्णय झाला
कर्नाटकापूर्वी अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीतही नुकताच डीडीएमएच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मास्क न घातल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. कारण गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून हे दिल्ली सराकरकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.  


दरम्यान, देशातील कोरोना संसर्गाचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत 2,593 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच शनिवारी दिवसभरात 1755 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल भारतात कोरोनाचे 2,527 नवे रुग्ण आणि 33 रुग्णांचा मृत्यू झाला.  


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 15 हजार 873 इतकी झाली आहे. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 22 हजार 193 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 19 हजार 479 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे.


महत्वाच्या बातम्या


Kids Immunity : कोरोनापासून मुलांचं संरक्षण कसं करावं ? 'या' विटामिनचा करा आहारात समावेश