Donald Trump On Twitter Deal : अमेरिकन अब्जाधीश एलॉन मस्क यांच्याकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरला 44 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेण्याच्या करारानंतर 'ट्विटर' पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, काहीही झाले तरी ते पुन्हा एकदा ट्विटरवर येणार नाहीत. असे काय कारण आहे की? ट्रम्प आता ट्विटरवर परतणार नाही? जाणून घ्या


TRUMP कधीही ट्विटरवर परतणार नाही, कारण...
मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरला नवा बॉस मिळाल्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प देखील आता ट्विटरवर परततील, अशी आशा व्यक्त करण्यात आली होती, ट्रम्प यांच्यावर गेल्या वर्षी कायमची बंदी घालण्यात आली होती. या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी कधीही ट्विटरवर परतणार नाही. ते म्हणाले, मी माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Truth Social वर राहीन. ट्विटरच्या नवीन बॉस मस्कबद्दल बोलताना ते म्हणाले, "मस्क एक चांगले व्यक्तीमत्व आहे, मला आशा आहे की ते ट्विटरमध्ये सुधारणा करतील. मात्र, मी Truth Social वर राहीन.


एलॉन मस्क ट्विटरचे मालक बनले


टेस्लाचे सीईओ एलोन मस्क, जे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत, त्यांनी ट्विटरचे शेअर्स विकत घेण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती. अखेर आता ते ट्विटरचे नवे मालक बनले आहेत.  इलॉन मस्क यांनी ट्विटरला प्रति शेअर $54.20 या दराने विकत घेण्याची ऑफर दिली होती, जी सोमवारी संध्याकाळी उशिरा ट्विटरच्या बोर्डाने स्वीकारली आहे. सध्या, ट्विटरवरून माहिती देताना, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी अखेर ट्विटर विकत घेतल्याचे सांगितले आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की, मस्कने ट्विटर विकत घेण्यासाठी US $ 44 अब्ज दिले आहेत. दरम्यान, टेस्लाचे मालक एलोन मस्क यांचे हा ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :