Space Delivery : जगभरात सामानाची डिलेव्हरी करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. अनेक वेळा तुम्ही काही सामान ऑर्डर करता, तेव्हा त्याची डिलेव्हरी ही डिलेव्हरी बॉय करतो. पण आता ही डिलेव्हरी थेट अंतराळातून एका स्पेस कॅप्सूलमधून केली जाणार आहे. अमेरिकेच्या (united states) ‘इनवर्जन स्पेस’नावाच्या कंपनीनं एका खास स्पेस कॅप्सूलचा शोध लावला आहे. या नव्या स्पेस कॅप्सूलच्या मदतीनं अंतराळातून जगातील कोणत्याही ठिकाणी सामानाची डिलेव्हरी होणार आहे. 


‘इनवर्जन स्पेस’या लॉस अँजेलिसच्या स्टार्टअप कंपनीनं ही माहिती दिली आहे की, अंतराळातून जगामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात सामानाची डिलेव्हरी करायचं काम हे कॅप्सूल करेल.  2021 मध्ये  ही कॅप्सूल तयार करण्यासाठी जवळपास एक कोटी खर्च करण्यात आले, असंही या कंपनीनं सांगितलं. त्याच्या मदतीने, ते जागतिक पुरवठा आणि स्पेस स्टेशनवर पुरवठा करू शकतात. हे रियूजेबल कॅप्सूल अंतराळातून अनेक वेळा प्रवास करून सामानाची डिलेव्हरी देऊ शकणार आहे. तसेच  अवकाश स्थानकामधून देखील हे कॅप्सूल सामानाची डिलेव्हरी करेल.  


‘इनवर्जन स्पेस’ या कंपनीनं अशी आशा व्यक्त केली आहे की, सरकारी आणि खाजगी क्षेत्रामध्ये या स्पेशल स्पेस कॅप्सूलची मागणी वाढेल. हे कॅप्सूल कोणत्याही प्रकारचे यान प्रक्षेपित करू शकते. सध्या कंपनी चार फूट व्यासाची कॅप्सूल विकसित करण्यावर काम करत आहे. ही कॅप्सूल तयार करण्यासाठी सौरऊर्जेचा वापर केला जाणार आहे. कंपनीने नुकतीच 'रे' या पॅराशूट चाचणी केली. या स्पेस कॅप्सूलचे समर्थन नासानं देखील केले आहे. 2025 पर्यंत हे कॅप्सूल विकसित होईल असंही म्हटलं जात आहे. 


अंतराळात फिरेल कॅप्सूल


स्पेस कॅप्सूल पूर्णपणे विकसित झाल्यानंतर ते अंतराळात ध्वनीच्या 25 पट वेगाने पृथ्वीच्या बाह्य वातावरणाला धडकेल आणि सॉफ्टलँडिंगसाठी पॅराशूट वापरेल. रिपोर्टनुसार, हे कॅप्सूल खाजग अंतराळात स्वतःचा मार्ग शोधेल किंवा स्वतःच्या कक्षेत राहील.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha