US Student Loan : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन  (Joe Biden)  यांनी अमेरिकन विद्यार्थ्यांना दिलासा देत मोठी घोषणा केली आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न $1,25,000 पेक्षा कमी आहे अशा यूएस विद्यार्थ्यांसाठी (US Student Loan) कर्ज माफ केले जाईल. निवडणूक दरम्यान विद्यार्थ्यांचे कर्ज माफ करणे हे बायडेन प्रशासनाचे (Biden Administration)मोठे वचन होते.


बायडेन यांनी ट्विट करत म्हटलंय..
त्यांनी या संदर्भात बायडेन यांनी ट्विट करत म्हटलंय, निवडणुकीत दिलेले वचन मी पूर्ण करणार आहे. मध्यमवर्गीयांना थोडा दिलासा देण्यासाठी आम्ही जानेवारी 2023 मध्ये काही अमेरिकन विद्यार्थ्यांची कर्जे माफ करणार आहोत किंवा कमी करणार आहोत.


 






काय आहे बायडेन यांची कर्जमाफी मोहीम?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी विद्यार्थी कर्ज माफीची घोषणा केली आहे. मात्र काही अटींसह त्यांनी ही घोषणा केली आहे. या अटी खालीलप्रमाणे आहेत...


-तुम्ही पेल ग्रँटवर कॉलेजमध्ये गेल्यास, तुम्हाला $20,000 सूट मिळेल
-मात्र तुम्ही पेल ग्रँटचा लाभ न घेतल्यास $10,000 सूट मिळेल. 
-त्यावरही, ही सूट फक्त त्या लोकांनाच मिळेल ज्यांचे वार्षिक उत्पन्न $125,000 पेक्षा कमी आहे.


31 डिसेंबर 2022 पर्यंत कर्ज द्यावे लागणार नाही


बायडेन प्रशासनाने डिसेंबर 2022 पर्यंत कर्जाची रक्कम कमी केली आहे. 31 डिसेंबर 2022 पर्यंत कर्ज द्यावे लागणार नाही. यानंतरही तुम्ही कर्ज जमा केल्यास, त्या कर्जासाठी तुम्हाला तुमच्या उत्पन्नाच्या फक्त 5 टक्के रक्कम जमा करावी लागेल. उदाहरणार्थ, तुमचे उत्पन्न 100 रुपये प्रति महिना असल्यास, तुम्हाला फक्त 5 रुपये कर्जाचा हप्ता जमा करावा लागेल.


इतर महत्वाच्या बातम्या


Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात आज रॅपिड फायर सुनावण्या; अवघ्या देशाचं लक्ष लागलेली तीन प्रकरण सुनावणीला


Todays Headline 25th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या