Delta Airlines Old Man Kissed: गेल्या काही महिन्यांत विमानात लघुशंका करणे आणि केबिन क्रूसोबत गैरवर्तनापासून ते मद्यधुंद अवस्थेतील प्रकाराची डझनभर प्रकरणे समोर आली आहेत. दरम्यान, विमानातील अशीच आणखी एक घटना पुन्हा समोर आली आहे. डेल्टा एअरलाईन्सच्या विमानात एका प्रवाशाने पुरुष अटेंडंटचे जबरदस्तीने चुंबन घेतले. अमेरिकेतील (America) मिनेसोटा शहरातून अलास्काला (Alaska) जाणाऱ्या विमानात 61 वर्षीय व्यक्तीने मद्यपान केले. त्यानंतर त्याने एका पुरुष केबिन क्रूला दारुच्या नशेत जबरदस्ती केली आणि त्याचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.


अमेरिकन न्यूज पेपर द न्यूयॉर्क पोस्टच्या बातमीनुसार, डेव्हिड अॅलन बर्क नावाचा प्रवासी 10 एप्रिल (सोमवार) रोजी मिनेसोटाहून (Minnesota) अलास्काला जात होता. डेव्हिड अॅलन बर्क हा बिझनेस फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करत होता. फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करत असल्याने कोणत्याही प्रवाशाला दारु पिण्यास परवानगी आहे. तथापि, विमानाचे स्वतःचे काही नियम होते, ज्यामुळे त्याला जास्त दारु पिण्याची परवानगी नव्हती.


केबिन क्रूच्या मानेवर घेतले चुंबन


विमान प्रवासादरम्यान वृद्ध व्यक्तीला जास्त दारु पिण्यास मनाई करण्यात आली, ज्यामुळे तो संतापला. त्यानंतर विमानातील पुरुष केबिन क्रू त्याच्याकडे काही हवे नको ते विचारण्यासाठी आला, त्यावेळी वृद्ध प्रवाशाने केबिन क्रूसोबत गैरवर्तन केले. वृद्ध प्रवासी विमानाच्या मधल्या मोकळ्या जागेत उभा राहिला आणि केबिन क्रूला थांबवले. प्रवासी डेव्हिड बर्कने केबिन क्रूचे चुंबन घेण्यापूर्वी त्याचे कौतुक देखील केले.


प्रवाशाने पुरुष केबिन क्रूला त्याचे चुंबन (Kiss) घेऊ देण्याची विनंती केली, पण केबिन क्रूने त्याला नकार दिला. त्यानंतर डेव्हिड अॅलन बर्कने केबिन क्रूला पकडले, त्याला आपल्याकडे खेचले आणि त्याच्या मानेवर चुंबन घेतले.


एफबीआय अधिकाऱ्यांनी केली चौकशी


चुंबन घेताना प्रवासी डेव्हिड बर्कने ट्रेमध्ये ठेवलेले अन्नही खराब केले. या घटनेनंतर फ्लाईट अटेंडंट केबिन क्रू रुममध्ये गेला. विमान अलास्का विमानतळावर उतरल्यानंतर वैमानिकाने विमानात घडलेल्या घटनेची माहिती दिली. यानंतर एफबीआयचे अधिकारी आरोपींची चौकशी करण्यासाठी दाखल झाले.


चौकशीदरम्यान आरोपीने कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यास नकार दिला. मात्र, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रवासी डेव्हिड बर्क यांना प्राणघातक हल्ला आणि गुन्हेगारी गैरवर्तनाच्या आरोपाखाली 27 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


MPSC Hall Ticket : 30 एप्रिलला होणाऱ्या MPSC परीक्षेचं हॉल तिकीट सोशल मीडियावर व्हायरल, टेलिग्राम लिंकवर 90 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट