वॉशिंग्टन: सीरियातील दहशतवादी तळांवर अमेरिकेने आज एअर स्ट्राइक केला आहे. हे दहशतवादी इराणच्या पाठिंब्यावर लढत असल्याचं सांगण्यात येतंय. काही दिवसांपूर्वी इराकमधील अमेरिकेच्या सैनिकांवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर असल्याचं सांगण्यात येतंय. जो बायडेन सत्तेत आल्यानंतर अमेरिकेची ही पहिलीच सैनिकी कारवाई आहे.


अमेरिकेने सीरियावर केलेल्या हल्ल्याचा परिणाम जगभर दिसून येईल अशी चर्चा आहे. जो बायडेन अध्यक्ष बनल्यानंतर अमेरिकेचा इराणशी असलेला तणाव निवळेल असं सागण्यात येत होतं. अमेरिका-इराण न्यूक्लियर डील पुन्हा होईल असं वाटत असतानाच या दोन देशांदरम्यान पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.


USA: अमेरिकेत स्थलांतरितांसाठी असलेल्या 'ग्रीन कार्ड'वरचे निर्बंध हटवले, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची घोषणा


या हल्ल्याला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मंजूरी दिली आहे. अमेरिकेच्या पेन्टॅगॉनने यासंबंधी माहिती दिली आहे. आता इराकमधील दहशतवादी तळावर हल्ला न करता सीरियातील दहशतवादी तळावर हल्ला करण्यात आला आहे. भविष्यात या भागातील सर्वच दहशतवादी तळांवर हल्ले करण्यात येतील असं पेन्टॅगॉनने आपल्या निवेदनात सांगितलंय. गेल्या काही वर्षात पश्चिम आशियात असलेल्या अमेरिकन सैनिकांवर सातत्याने हल्ले होताना दिसत आहेत. त्या हल्ल्याला आज अमेरिकेने प्रत्युत्तर दिल्याचं सांगण्यात येतंय.


गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सीरियाच्या उत्तरी भागातील रक्का या शहराच्या जवळ सीरियाच्या सैन्यदलावर अमेरिकन विमानांनी हल्ला केला होता. रक्काच्या अल-रसाफिह क्षेत्रात सीरियाचे सैन्य शहराच्या बाजूने येत होतं. या भागात अमेरिका आपले वर्चस्व गाजवू पाहत आहे. याच भागात तुर्कीने आपली सैन्य कारवाई सुरु केली आहे.


Corona: अमेरिका, ब्रिटन 2021 पर्यंत हर्ड इम्युनिटी प्राप्त करतील पण युरोपियन युनियन अद्याप दूर, स्टॅटिस्टाचा अहवाल