US Election Results 2024 : अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी (US Presidential Election) पुढच्या पाच दिवसांनी मतदान होणार आहे. उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यात अध्यक्षपदासाठी ही लढत होत आहे. अतिशय अटीतटीची लढत होत आहे. दरम्यान, अमेरिकेत मतदान कधी होणार आहे? निवडणुकीचा निकाल कधी लागणार आहे? हा निकाल तुम्हाला नेमका कुठं पाहायला मिळेल? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 


अमेरिकेत अध्यक्षीय पदासाठी कधी निवडणूक होणार? 


अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. बहुतेक ठिकाणी मतदान केंद्रे स्थानिक वेळेनुसार सकाळी 6:00 ते रात्री 8:00 पर्यंत खुली असणार आहेत. (6 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार अंदाजे 4:30 ते 6:30 पर्यंत).


निकाल कधी जाहीर होणार?


निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 नोव्हेंबरला एक्झिट पोल समजणर आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 नंतर एक्झिट पोल येण्यास सुरुवात होणार आहे. मतमोजणी पूर्ण होताच अमेरिकेतील विविध राज्यांतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत. मात्र प्रत्येक राज्याच्या मतांची मोजणी झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. अंतिम निर्णयाला अनेक दिवस किंवा आठवडे लागू शकतात. किती वेगाने मतमोडणी होणार यावर ते अवलंबून आहे.


निकाल कुठं पाहता येणार? 


निवडणुकीचे निकाल रिअल टाइममध्ये जाणून घेण्यासाठी, तुम्ही एबीपी न्यूजच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मशी कनेक्ट होऊ शकता. एबीपी न्यूज या आमच्या दूरचित्रवाणी वाहिनीवर थेट कव्हरेजसोबतच, तुम्ही एबीपी लाईव्हच्या यूट्यूब चॅनेलवर निवडणूक निकाल पाहू शकता. तुम्ही आमच्या वेबसाइट abplive.com वर थेट निकाल वाचू शकता.


एलॉन मस्क यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा


अमेरिकेत 5 नोव्हेंबरला होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीबाबत जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला आहे. इतकेच नाहीतर ट्रम्प यांच्यावर टीका करणाऱ्यांवरही चोख प्रत्युत्तर दिले आहे. एलॉन मस्क यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला अवघे सात ते आठ दिवस उरले आहेत. यामुळे सध्या अमेरिकेत राजकीय वातावरण तापले आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्या निवडणुकीसाठी लढत सुरू आहे. त्यातच माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी मिशिगनमध्ये कमला हॅरिस यांच्या समर्थनार्थ रॅली काढली. मिशेलने या रॅलीत कमला हॅरिस यांना पाठिंबा देत अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षाची निवड करण्यासाठी आव्हान दिले आहे.


महत्वाच्या बातम्या:


Nikki Haley: अमेरिकेचा पुढचा अध्यक्ष भारतीय वंशाचा? निक्की हॅलेंची निवडणूक लढवण्याची घोषणा