US attacks on Iran: इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे मध्यपूर्वेत युद्धाचे ढग दाटले असतानाच अमेरिकेने या युद्धात उडी घेतली होती. शनिवारी रात्री अमेरिकेच्या अत्याधुनिक बी 2 स्टील्थ बॉम्बर्स विमानांनी इराणमधील (Iran) तीन आण्विक तळांवर हल्ला केला होता. याठिकाणी अमेरिकेने शक्तिशाली बॉम्ब टाकून इराणने जमिनीच्या खाली उभारलेल्या लष्करी सुविधा आणि आण्विक तळ उद्ध्वस्त केला होता. अमेरिकेने भारतीय प्रमाण वेळेनुसार रविवारी पहाटे 4.10 मिनिटांनी इराणमध्ये ऑपरेशन मिडनाईट हॅमर (Midnight hammer) सुरु केले. पुढच्या 25 मिनिटांमध्ये तीन आण्विक तळांवर हल्ले करण्यात आले. US B-2 स्टील्थ बॉम्बर्स आणि तोमहॉक क्रूझ मिसाईलचा मारा फोर्डो, नतान्झ आणि इस्फाहान या आण्विक केंद्रांवर करण्यात आला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन जगाला माहिती दिली होती. अमेरिकेच्या बी 2 स्टील्थ बॉम्बर्स या विमानांनी तब्बल सलग 37 तास हवेत राहून इराणमध्ये हा हल्ला केल्याचे ट्रम्प यांनी सांगितले होते. या हल्ल्यानंतर इराणने नमते घ्यावे, जेणेकरुन या परिसरात शांतता प्रस्थापित होईल, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केले. मात्र, इराणने यानंतरही नमते घेतले नाही तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता.
या हल्ल्यानंतर इराणने नमते घेणे तर सोडाच पण अधिक आक्रमक भूमिका घेतली होती. अमेरिकेला या हल्ल्याची अभूतपूर्व किंमत मोजावी लागेल. अमेरिकेचे आतापर्यंत कधी झाले नाही असे नुकसान होईल. हे युद्ध अमेरिकेने सुरु केले आहे, याचा शेवट आम्ही करु. इथून पुढे प्रत्येक अमेरिकी आणि त्यांचे सैनिक आमचे लक्ष्य असेल, असा इशारा इराणने दिला होता. हा इशारा दिल्यानंतर इराणने अवघ्या काही तासांमध्ये इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा सुरु केला होता. यामध्ये इस्रायलची राजधानी असलेल्या जेरुसलेम, हायफा आणि तेल अविव या शहरांना लक्ष्य करण्यात आले होते. इराणची काही क्षेपणास्त्रं तेल अविवमध्ये पडल्यानंतर इमारतींचे नुकसान झाले होते. या हल्ल्यात 11 नागरिक जखमी झाले होते. इराणकडून रविवारी पहिल्यांदाच खेबर शिकन या क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. इस्रालयच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात इराणकडून इस्रायलमधील जवळपास 10 ठिकाणी हल्ले करण्यात आले.
Iran Israel War: इराणचा मोठा निर्णय, हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी
इस्रायल आणि अमेरिकेने हल्ला केल्यानंतर इराणने संपूर्ण जगावर परिणाम होणारा एक निर्णय घेतला आहे. त्यानुसार इराणी संसदेने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. या सामुद्रधुनीतून मोठ्याप्रमाणावर आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो. हॉर्मुझ सामुद्रधुनीतून क्रूड ऑईल आणि अनेक वस्तूंचा व्यापार होतो. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जलवाहतूक बंद झाल्यास संपूर्ण जगाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. गभरातील 20 टक्के तेल आणि गॅसचा व्यापार या मार्गानं होतो. जर, हा मार्ग बंद झाला तर कार्गो जहाजांना त्यांचा मार्ग बदलून प्रवास करावा लागेल. वाहतुकीच्या खर्चात वाढ होईल. याचा फटका संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थांना बसेल.
Iran Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च नेते खामेनींना संपवण्यासाठी अमेरिकेचा इस्रायलला पाठिंबा
इरायण आणि इस्रायल यांच्यातील यु्द्धाचा आजचा 11 वा दिवस आहे. या काळात इस्रायलने इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांना ठार मारण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. अली खामेनींना ठार मारल्यास हे युद्ध संपुष्टात येईल, असा इस्रायलचा अंदाज आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स (JD Vance) यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना संपवण्यासाठी अमेरिका इस्रायलला पाठिंबा देईल, असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर अली खामेनी यांनी काही तासांपूर्वीच आपल्या तीन उत्तराधिकाऱ्यांची निवड केल्याची माहिती आहे.
आणखी वाचा