दोहा : अफगाणिस्तानमध्ये शांततेसाठी कतारची राजधानी असलेल्या दोहामध्ये अमेरीका आणि तालिबान मध्ये शांतता करार करण्यात आला आहे. जवळपास 18 महिन्यांच्या चर्चेनंतर या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी देखील करण्यात आली आहे. जवळपास 30 देशांचे प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संघटनाचे पराराष्ट्रीय मंत्री आणि प्रतिनिधी या ऐतिहासिक कराराच्या वेळी उपस्थित होते.
या करारानुसार अमेरिका 14 महिन्याच्या आत अफगाणिस्तान आपल्या सैन्याला माघारी बोलवणार आहे. अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानमध्ये गेल्या 18 वर्षापासून आहे. अमेरिकेमध्ये 11 सप्टेंबर 2001 ला झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानमध्ये आहे. सैन्याच्या या लढाईमध्ये आतापर्यंत बरेचसे नागरिक मारले गेले आहे.
अफगाणिस्तान आणि अमेरिकेने संयुक्त घोषणा केली. या घोषणेमध्ये म्हणाले की, अफगाणिस्तानमधील अमेरिका सैन्याची संख्या कमी करून 8600 केली जाणार आहे. त्याचबरोबर अमेरिका- तालिबान शांती करारत केलेल्या तरतूदींची अमंलबजावणी 135 दिवसात केली जाणार आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ म्हणाले, तालिबानने शांतता करारात दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होते की नाही यावर आम्ही बारीक नजर ठेवणार आहे. त्यानंतरच आम्ही अफगाणिस्तानातून अमेरिकी लष्करी सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेणार आहे. तालिबान शांततेसाठी जेव्हा पावले उचलतील तेव्हाच हा करार पूर्णपणे अंमलात येणार आहे. यासाठी तालिबानला दहशतवादी संघटना अल कायदा व इतर परदेशी दहशतवादी संघटनांशी त्यांचे सर्व संबंध तोडावे लागणार आहे. हा करार हा या क्षेत्रातील एक प्रयोग आहे.
या करारानुसार अमेरिका आणि तालीबानमधील करारानुसार अफगाणिस्तानमध्ये शांतता कायम राहील आणि अफगाणिस्तान या युद्धातून बाहेर पडेल.
Section 144 | मुंबईत 9 मार्चपर्यंत जमावबंदी, दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निर्णय