Russia Ukraine War : युक्रेन आणि रशियामधील युद्धाचा आज 13 वा दिवस आहे. दोन्ही देशांमधील चर्चेची तिसरी फेरीतील चर्चाही निष्फळ ठरली आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी कीव्हमध्ये असल्याचा दावा करणारा व्हिडिओ जारी केला आहे. 'मी कोणालाही घाबरत नाही', असे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. मी लपणार नाही. युद्ध जिंकण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. झेलेन्स्की आपल्या देशातून पळून गेल्याचे रशियन प्रसारमाध्यमांकडून सातत्याने बोलले जात असताना युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या वतीने व्हिडिओ जारी करून हा दावा फेटाळण्यात आला आहे. यापूर्वीही झेलेन्स्की यांनी युक्रेनमध्येच असल्याचा दावा करण्यात आला होता.


युद्धबंदीनंतरही रशियाचे हल्ले सुरूच 
दरम्यान, रशियाने नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सोमवारी सकाळपासून युद्धविरामासह अनेक भागात मानवतावादी कॉरिडॉर उघडण्याची घोषणा केली. हा कॉरिडॉर मुख्यतः रशिया आणि त्याच्या सहयोगी, बेलारूसकडे जात आहेत. नागरिकांना बाहेर काढले जात आहे की नाही याबाबत अद्यार काही स्पष्ट झालेले नाही. मात्र, कॉरिडॉरच्या घोषणेनंतरही, रशियन सैन्याने काही युक्रेनियन भागात रॉकेट हल्ले आणि भयंकर लढाई सुरूच ठेवली आहे.


उत्तर, दक्षिण आणि मध्य युक्रेनमधील शहरांमध्ये रशियाने गोळीबार सुरू ठेवल्याने हजारो युक्रेनियन सुरक्षितपणे पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. रशियन संरक्षण मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, राजधानी कीव्ह, दक्षिणेकडील बंदर शहर मारियुपोल, युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर खार्किव आणि सुमी येथून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्याचवेळी रशिया आणि युक्रेन यांच्यात सोमवारी तिसरी फेरी पार पडली. रशिया आणि युक्रेनमधील तिसऱ्या फेरीतील चर्चादेखील कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय संपली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha