Chemical Attack: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सलग 20 व्या दिवशीही सुरूच आहे. याच दरम्यान युक्रेनमध्ये रासायनिक युद्ध होऊ शकते, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. रशिया युक्रेनवर रासायनिक अस्त्रांनी हल्ला करू शकतो, असा दावा ब्रिटनने केला आहे. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, रशिया युक्रेनवर जैविक किंवा रासायनिक शस्त्रे वापरून हल्ला करण्याचा विचार करत आहे. याआधी अमेरिकेनेही रशियावर हा आरोप केला होता. रशियन सैनिक युक्रेनच्या विविध शहरांना लक्ष्य करत आहेत. पूर्वेकडील लुहान्स्कमधील पोपस्ना शहरात व्हाईट फॉस्फरस बॉम्बचा वापर करण्यात आल्याचा आरोप युक्रेनने केला आहे, जे मानवांसाठी अत्यंत घातक आहेत.


रशिया रासायनिक शस्त्रे वापरू शकतो: ब्रिटन 


ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने सोमवारी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, रशियन सैन्यावरील बनावट हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रशिया युक्रेनमध्ये रासायनिक किंवा जैविक शस्त्रे वापरण्याची योजना आखू शकतो. तथापि, या दाव्याचे समर्थन करण्यासाठी यूकेने कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. याला इंटेलिजन्स अपडेट म्हटले जात आहे. याआधी अमेरिकेच्या अधिकार्‍यांनीही रशिया युक्रेनविरुद्ध जैविक शस्त्रे वापरण्याची योजना आखत असल्याचा दावा केला होता. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाच्या एका ट्विटर पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, युक्रेनविरूद्ध बनावट हल्ल्याच्या पुराव्याद्वारे हे ऑपरेशन केले जाऊ शकते.


अमेरिकेने रशियाला दिला इशारा 


ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने रशियाच्या आरोपांचे समर्थन करण्यासाठी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. अशातच आता रशियानेही युक्रेनवर रासायनिक आणि जैविक शस्त्रांवर संशोधन करत असल्याचा आरोप केला आहे. यावरच बोलताना संयुक्त राष्ट्रांनी शुक्रवारी सांगितले की, युक्रेनकडे जैविक शस्त्रे कार्यक्रम सुरू असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अलीकडेच रशियाला इशारा दिला होता की, रशियाच्या सैन्यांनी युक्रेनवर रासायनिक अस्त्रांचा वापर केल्यास याची मोठी किंमत मोजावी लागले.


संबंधित बातम्या :