United Kingdom : ब्रिटन सरकारनं नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. ईस्टरला यूकेमधील (United Kingdom) सर्व शाळांना सुट्टी मिळण्याआधी प्रवासावरील निर्बंध  हे शुक्रवारी (18 मार्च) हटवण्यात येणार आहेत. त्यामुळे ब्रिटन सरकारकडून नागरिकांना हे ईस्टरचं गिफ्ट मिळालं आहे असं म्हणता येईल.  ब्रिटनचे परिवहन मंत्री ग्रँट शॅप्स (Grant Shapps) यांनी सोमवारी सांगितले की, 'आता नियम हटवल्यामुळे येथील नागरिक कोरोना आधीच्या चांगल्या दिवसांसारखा प्रवास करू शकणार आहे. '


यूकेमध्ये, कोविड-19 निर्बंधांनुसार, प्रवाशांना एका फॉर्ममध्ये प्रवास तपशील देणे आवश्यक होते. यामध्ये प्रवाशांना ते यूकेमध्ये ते कुठे राहणार आहेत तसेच त्यांनी लसीकरण केले आहे की नाही हे सांगणे आवश्यक होते. पण आता शुक्रवारपासून हा फॉर्म भरण्याचा नियम हटवण्यात येणार आहे.


तसेच लसीकरण न केलेल्या प्रवाशांना यूकेमध्ये येण्यापूर्वी आणि येथून जाताना कोविड-19 ची चाचणी करावी लागत होती. आता हा देखील नियम हटवण्यात आला आहे. ही घोषणा अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंडमध्ये कोरोनाच्या संसर्गाची प्रकरण वाढत आहे.  रोग्य मंत्री साजिद जाविद यांनी सांगितले, 'आम्ही नियम हटवल्यानंतर होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करणार आहोत. आणि आवश्यक असल्यास नियम पुन्हा लागू करू'


संबंधित बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha