Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरूच आहे. या हल्ल्यात दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनमध्ये सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे लोकांना घरे सोडावी लागत आहेत. लोक घरातून बेघर होत आहेत. या हल्ल्यात केवळ युक्रेनची जीवित तसेच मालमत्तेची हानीच होत नाही, तर अनेक रशियन सैनिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. पण या युद्धात युक्रेनच्या एका शेतकऱ्याच्या बाबतीत जे घडले ते आश्चर्यकारक आहे. युक्रेनमधील एका शेतकऱ्याची बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.


जंगलात रशियन सैन्याची युद्धनौका सापडली


माहितीनुसार, रशियाच्या हल्ल्यादरम्यान युक्रेनचा एक शेतकरी जंगलात फिरायला गेला होता. जिथे त्याला जंगलात रशियन सैन्याची युद्धनौका सापडली. खार्किवचा रहिवासी असलेला हा शेतकरी रशियन लष्कराची युद्धनौका चोरून 15 अब्जांचा मालक झाला. एक माणूस या युद्धनौकेवर स्वार होताना दिसत आहे. शेतकऱ्याने रशियन सैन्याची युद्धनौका चोरली आणि 15 अब्जांचा मालक झाला.


गरीब शेतकरी कोट्यवधींचा धनी


रशियाच्या हल्ल्याच्या वेळी शेतकरी जंगलात गेला होता. यादरम्यान त्याने पाहिले की अरबांच्या रशियन सैन्याची 9K330 Tor SAM ही युद्धनौका पडून आहे. इगोरला मिळालेल्या युद्धनौकेचे नाव 'द टॉर' आहे. ही युद्धनौका सोव्हिएत युनियनमध्येच तयार करण्यात आली आहे. जी शक्तिशाली आहे. त्या व्यक्तीने ती घराबाहेर पार्क केली आहे. आता हा गरीब शेतकरी कोट्यवधींचा धनी झाला आहे. ओरिक्स नावाच्या पेजवरून या शेतकऱ्याची बातमी ट्विटरवर शेअर करण्यात आली आहे.


महत्वाच्या बातम्या


चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक; तीन शहरांत लॉकडाऊन तर तीन कोटी नागरिकांना घरात राहण्याचे आदेश


दूध 150 रु, साखर 100 रु तर टॉमेटो 80 रुपये, पाकिस्तानात महागाई, चीनला फायदा!


Pak PM Imran Khan : बटाटा-टोमॅटोचे भाव तपासण्यासाठी मी राजकारणात आलो नाही, तर...