Meta to list of terrorist organisations : रशिया-युक्रेन (Russia Ukraine Conflict) वादानंतर रशियन सरकारने फेसबुक आणि ट्वीटरसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ब्लॉक केले होते. मार्चमध्ये मॉस्को कोर्टाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन युक्रेनमधील नेटकरी रशियन लोकांविरुद्ध चुकीची महिती पसरवून हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा दावा केला होता. ज्यानंतर आता रशियन सरकारनं थेट फेसबुक अर्थात मेटा हीच दहशतवादी संघटना असल्याचा निर्णय दिला आहे. AFP वृत्तसंस्थेनं याबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे रशियानं मेटाबाबत हा निर्णय घेतल्यानं मेटाशी संबधित इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम यावरही याचा परिणाम होणार आहे.






वेस्ना ही युद्धविरोधी संघटना देखील या दहशतवादी यादीत असल्याचं रशियन सरकारनं सांगितलं. रशियातील इंटरफॅक्स या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली. दरम्यान या सर्व निर्णंयामागे रशियाची फेडरल आर्थिक देखरेख कंपनी 'रोसफिनमॉनिटरिंग' (Rosfinmonitoring) असल्याचंही समोर आलं आहे. रशियाने मेटाला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला असता मेटाच्या वकिलांनी हे आरोप फेटाळले होते.


अजूनही हल्ले सुरुच


सोमवारी (10 ऑक्टोबर) रशियाने युक्रेनची राजधानी कीवसह अनेक शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. रशियाने यावेळी एकूण 84 क्षेपणास्त्रे डागल्याचं दिसून आलं. या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू देखील झाला असल्याची माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली. युक्रेनमधील या हिंसाचारावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील एक निवेदन जारी करून चिंता व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, युक्रेनमधील वाढत्या हिंसाचाराबद्दल भारत चिंतित आहे. हिंसाचार कोणाच्याही हिताचा नसल्याचंही यावेळी भारतानं म्हटलं. हिंसाचार संपवून दोन्ही देशांनी संवादाच्या मार्गाचं अवलंबन करावं. भारत शांततेच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी आणि मदत करण्यास तयार असल्याचंही भारताकडून सांगण्यात आलं. दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशिया युक्रेनवर नुकत्याच दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं की, 'आम्ही लढतोय. युक्रेनियन सैनिक आणि हवाई दलाचे आभार. त्यांनी ही लढाई अद्याप सुरु ठेवली आहे. युक्रेन हार मारणार नाही किंवा थांबणार नाही. युक्रेनला घाबरवणं शक्य नाही. शत्रू रणांगणात आमच्यासोबत लढू शकत नाही, म्हणून त्यांच्याकडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण युक्रेन घाबरणार नाही. युक्रेन सरकारकडून एअर अलर्ट जारी करण्यात आला आहे. काळजी घ्या, सतर्क राहा, नियम पाळा. युक्रेनवर आणि युक्रेनच्या सैन्य दलावर विश्वास ठेवा. विजय आपलाच आहे.'


इतर महत्वाच्या बातम्या