नवी दिल्ली : पंतप्रधान (Boris Johnson ) बोरिस जॉन्सन यांनी कोरोना विषाणूचं बळावतं संकट पाहता (UK) इंग्लंडमध्ये (England) सोमवारपासून पुन्हा एकदा सक्तीचा लॉकडाऊन अर्थात टाळेबंदी लागू करत असल्याचं जाहीर केलं. देशात कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग अतिशय झपाट्यानं होत असल्यामुळं त्यांनी हा निर्णय़ घेतला.
'मागच्या वर्षी जेव्हा या महामारीला सुरुवात झाली होती, तेव्हा संपूर्ण युनायटेड किंग्डममधील नागरिकांनी या विषाणूशी लढा देण्यात योगदान दिलं. आणि यात अजिबात शंका नाही, की या जुन्या विषाणूशी दिलेली झुंज यशस्वीही ठरताना दिसत होती. पण, आता या विषाणूच्या एका नव्या प्रकाराची माहिती मिळाली आहे. या विषाणूच्या संसर्गाचा वेग हा अतिशय तणावपूर्ण आणि सतर्क करणारा आहे', असा इशारा देत जॉन्सन यांनी देशातील नागरिकांना सावध केलं.
इंग्लंडमधील रुग्णालयांवर कोविड रुग्णांमुळं यापूर्वी कधीच आला नव्हता इतका ताण आला आहे, ही वस्तुस्थिती समोर ठेवत रुग्णांचा वाढलेला आकडा हा मागच्या वर्षीच्या एप्रिलपेक्षाही जास्त असल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली. स्कॉटलंडमध्ये (Lockdown) लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर जॉ़न्सन यांनी इंग्लंडाठी घेतलेला हा निर्णय़ जाहीर केला. यापूर्वीच, वेल्स आणि नॉर्थन आयर्लंड इथंही सक्तीचा लॉगडाऊन लागू करण्यात आला आहे. ही सर्व परिस्थिती देशासमोर ठेवत असताना त्यांनी कोरोनामुळ वाढलेला मृतांचा आकडाही 20 टक्क्यांनी वाढल्याचं सांगितलं.
Corona Vaccine | जागतिक आरोग्य संघटनेकडून Pfizer-BioNTech लसीच्या इमर्जन्सी वापराला मंजुरी
कोरोनाच्या (Coronavirus) या नव्या व्हॅरिएंटला अर्थात नव्या प्रकाराच्या वाढत्या संसर्गाना नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण देशानं एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत असं म्हणत त्यांनी किमान लसीकरण सुसूत्रतेनं सुरु होईपर्यंत तरी कमालीची सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचा मुद्दा अधोरेखित केला. आपल्या या संबोधनाच्या माध्यमातून त्यांनी देशात पुन्हा एकदा सक्तीची टाळेबंदी लागू करण्यात असल्याची जाहीर आणि अधिकृत घोषणा केली. शिवाय सरकारतर्फे सर्वच नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहनही केलं.
अत्यावश्यक कारणं, वैद्यकिय कारणं, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी आणि कौटुंबीक हिंसेतून मदत मागण्यासाठीच्या कारणांनीच घराबाहेर पडण्याची मुभा नागरिकांना असेल असंही त्यांनी नमूद केलं. इग्लंडमधील शाळा, माध्यमिक विद्यालयं, महाविद्यालयं यांच्यावरही या लॉकडाऊनचे थेट परिणाम होणार आहेत.
खुल्या ठिकाणी होणाऱ्या क्रीडा प्रकारांवरही यादरम्यानं बंदी आणली गेली आहे. पण, नर्सरी सुरुच राहतील. एलिट प्रकारांमध्ये येणारे क्रीडाप्रकार सुरुच राहतील. शिवाय धर्मस्थळंही सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, पण इथं सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं सक्तीनं पालन केलं जावं असं आवाहनही त्यांनी केलं.