COVID restrictions in England : कोरोनाची (coronavirus) साथ सुरू होऊन दोन वर्षे उलटली आहेत आणि आता जग त्याच्यासोबत जगायला शिकत आहे. लोकांना व्हायरससोबत जगायला शिकण्यास मदत करण्यासाठी पुढील आठवड्यापासून यूकेमध्ये एक नवीन योजना अमलात आणली जाणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जाहीर केले की, कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांना पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये आयसोलेशनमध्ये (home isolation) राहण्याची आवश्यकता नाही. दरम्यान ब्रिटेनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांना कोरोनाची लागण झालीय. अशातच कोरोना निर्बंध हटवण्याची घोषणा करण्यात आल्याने हा एक चर्चेचा विषय ठरत आहे.
एक नवीन योजना
जॉन्सन यांनी ट्विट केले, "COVID-19 अचानक नाहीसा होणार नाही, आणि आपण या विषाणूसोबत जगायला शिकले पाहिजे.आपल्या स्वातंत्र्यावर बंधने न घालता स्वतःचे संरक्षण करणे सुरू ठेवले पाहिजे. गेली दोन वर्षे लस रोलआउट्स, नवीन उपचार,अशा परिस्थितीत जगत आहोत. यूके सरकारच्या म्हणण्यानुसार या आठवड्यात व्हायरससह जगण्यासाठी एक नवीन योजना अमलात आणली जाणार आहे. अशातच युकेच्या पंतप्रधानांकडून प्रतिबंधित करणारे सर्व नियम रद्द करण्यात येत असल्याचे समजते. सरकारने म्हटले आहे की, सार्वजनिक स्वातंत्र्यावर मर्यादा घालणारे सर्व घरगुती COVID-19 नियम या आठवड्यात शिथील करण्यात येणार आहेत.
ब्रिटनच्या राणीला कोरोना झाल्यावरही UK मध्ये निर्बंध हटवणार?
दरम्यान, रविवारी 95 वर्षीय ब्रिटेनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे काळजीचे कारण नसल्याचे बकिंगहम पॅलेस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. रॉयटर्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय या आपला मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्स अर्थात प्रिन्स ऑफ वेल्सच्या संपर्कात आल्या होत्या. प्रिन्स चार्ल्स यांना गेल्या गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. (Britain Queen Elizabeth II tested Covid- 19 positive:)
कोरोनाव्हायरसला फ्लूसारखे मानले जाईल.
बकिंगहम पॅलेसनं रविवारी आपल्या निवदेनात म्हटलं की, " महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांना कोरोनाची लागण झालीय. त्यांना सौम्य ताप-थंडीची लक्षण आहेत. पण काळजी म्हणून पुढील आठवडभर त्यांच्यावर विंडसर इथं उपचार केले जाणार आहेत. या ठिकाणी राणीला वैद्यकीय मदत मिळत राहील. विंडसर येथे राणी योग्य मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करतील."मात्र दुसरीकडे येत्या आठवड्यापासून, इंग्लंडमध्ये कोविड-19 ची लागण झालेल्या लोकांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्याची गरज भासणार नाही. याचा अर्थ असा की, कोरोना पॉझिटिव्ह चाचणीनंतर पाच दिवसांच्या आयसोलेशनची आवश्यकता भासमार नाही आणि कोरोनाव्हायरसला फ्लूसारखे मानले जाईल.
मात्र युके सरकारच्या या निर्णयावर समीक्षक आणि सरकारी सल्लागार असा युक्तिवाद करतात की, हे एक धोकादायक पाऊल आहे ज्यामुळे संक्रमण वाढू शकते आणि भविष्यात अधिक धोकादायक प्रकारांविरूद्ध देशाचे संरक्षण कमी होऊ शकते. या घोषणेमुळे अनेक कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदारांना संतुष्ट करण्याची शक्यता आहे, ज्यांनी असा युक्तिवाद केला आहे की, कोरोनामुळे लादलेले निर्बंध विसंगत आणि अकार्यक्षम होते. बूस्टर लसींच्या रोलआउटवर आता भर देण्यात येणार आहे, सरकार अतिसंवेदनशील लोकांना अतिरिक्त बूस्टर डोस देऊ करेल, तसेच अँटीव्हायरल उपचारांसाठी फार्मास्युटिकल्स हस्तक्षेप करेल. असं युके सरकारने म्हटलंय.
निर्बंध हळूहळू कमी
कोरोना महामारीने जगभरात हाहा:कार माजवला असतानाच ब्रिटेनमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे, त्यामुळे देशातील निर्बंध हळूहळू कमी केले जात आहेत. पण जगातील तज्ज्ञांच्या मते, कोरोनाचे आणखी काही व्हेरियंट येऊ शकतात, त्यामुळे लसीकरणावर भर दिला पाहिजे. तसेच कोरोना नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine Conflict and India : रशिया-युक्रेन युद्ध झाल्यास भारतावर काय होईल परिणाम?
- Explainer : रशियानं युक्रेनमधील प्रांताबाबत घेतलेल्या निर्णयाचा नेमका अर्थ काय?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha