UAE Missile Attack : संयुक्त अरब अमिराती (UAE) ने सोमवारी पहाटे राजधानी अबूधाबीला लक्ष्य करण्यासाठी हुथी बंडखोर गटाने डागलेल्या दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना रोखले आणि नष्ट केले. यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. अबुधाबीच्या आजूबाजूच्या वेगवेगळ्या भागात रोखलेल्या आणि नष्ट केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे अवशेष पडले. यूएईने कोणत्याही धोक्याचा सामना करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.
यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने ट्विट केले आहे की, "हुथी दहशतवाद्यांनी सोमवारी देशाच्या दिशेने डागलेल्या दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना हवाई संरक्षण यंत्रणेने रोखले आणि नष्ट केले." यूएई कोणत्याही प्रकारच्या धोक्याचा सामना करण्यासाठी तयार आहे आणि संरक्षणासाठी सर्व आवश्यक पावले उचलली गेली आहेत.
मंत्रालयाने जनतेला देशातील अधिकृत वृत्त स्रोतांकडून मिळालेल्या माहितीवर अवलंबून राहण्याचे आवाहन केले आहे. येमेनच्या हुथी बंडखोरांनी अबू धाबीमधील पेट्रोलियम डेपो आणि देशाच्या मुख्य विमानतळावर हल्ला केल्यानंतर एका आठवड्यानंतर हा हल्ला झाला आहे.
संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबुधाबी येथे 17 जानेवारी रोजी सकाळी मुसाफाने ICAD-3 क्षेत्र आणि अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नव्याने बांधलेल्या क्षेत्राला लक्ष्य केले. तीन पेट्रोलियम टँकरच्या स्फोटात दोन भारतीय आणि एक पाकिस्तानी नागरिक ठार झाले, तर सहा जण जखमी झाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Joe Biden : 'या' प्रश्नावर बिथरले राष्ट्राध्यक्ष बायडेन, माइकवरच पत्रकाराला हासडली शिवी
- Omicron : चिंताजनक! आयसीयूमधील रुग्णांची संख्या वाढतीच, ओमायक्रॉनला हलक्यात घेण्याची चूक पडू शकते भारी
- Coronavirus Cases Today : देशातील कोरोनाबाधितांमध्ये मोठी घट, 50 हजारांहून अधिक रुग्ण कमी, गेल्या दिवसभरात 2 लाख 55 हजार 874 रुग्ण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha