Coronavirus Cases in India Today : देशात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना (Corona) रुग्णवाढीत घट पाहायला मिळत आहे. त्यातच मागील 24 तासात वाढणाऱ्या रुग्णांची संख्या देखील कमालीची कमी झाली आहे. देशात गेल्या 24 तासात  2 लाख 55 हजार 874 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशातील दैनंदिन रुग्णवाढीचा आलेख सलग चौथ्या दिवशी घसरताना पाहायला मिळतोय. यापूर्वी, सोमवारी कोरोनाचे 3 लाख 6 हजार 64 नवीन रुग्ण आढळल्यानंतर, देशातील कोरोना संक्रमित लोकांची संख्या 3 कोटी 95 लाख 43 हजार 328 वर पोहोचली होती.


देशातील संक्रमित लोकांची संख्या 7 ऑगस्ट 2020 रोजी 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांवर गेली होती. 16 सप्टेंबर 2020 रोजी संसर्गाची एकूण प्रकरणे 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर रोजी 90 लाखांवर गेली.





 


19 डिसेंबर 2020 रोजी या रुग्णांनी देशात एक कोटींचा आकडा पार केला होता. गेल्या वर्षी 4 मे रोजी बाधितांचा आकडा दोन कोटींच्या पुढे गेला होता आणि 23 जून 2021 रोजी तीन कोटींच्या पुढे गेला होता. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात संसर्गामुळे मृत्यूची 439 प्रकरणे नोंदली गेली आहेत. यापैकी केरळमध्ये 77 आणि महाराष्ट्रात 44 रुग्ण आढळले आहेत.


आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 4 लाख 89 हजार 848 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे, त्यापैकी महाराष्ट्रातील 1 लाख 42 हजार 115, केरळमधील 51 हजार 816, कर्नाटकातील 38 हजार 582, तामिळनाडूमधून 37 हजार 218, दिल्लीतील 25 हजार 620 लोकांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशमध्ये 23 हजार 56 आणि पश्चिम बंगालमधून 20 हजार 338 जणांचा समावेश आहे.


आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांपैकी 70 टक्क्यांहून अधिक रुग्णांना इतर आजारही होते. मंत्रालयाने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे की, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) आकडेवारीशी त्यांची आकडेवारी जुळत आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha