Omicron Community Spreading : कोरोना विषाणूच्या (SARS-CoV-2) जनुकांमधील बदल, संसर्गाची लक्षणे आणि परिणामांवर बारकाईने लक्ष ठेवणारी सरकार-मान्यता प्राप्त संस्था इंसाकॉग - जीनोमिक्स सिक्वेन्सिंग कन्सोर्टियम इंसाकॉग ही एक संस्था आहे. ज्याद्वारे केंद्रीय आरोग्य मंत्रालय देशातील कोरोना विषाणूच्या जनुकांवर पाळत ठेवते. इंसाकॉगद्वारे कोरोनाशी संबंधित सर्व पैलूंवर तपशीलवार माहितीसह एक साप्ताहिक बुलेटिनदेखील प्रकाशित केले जाते. यावेळचा नवीनतम अंक 23 जानेवारी रोजी प्रकाशित झाला आहे, ज्यामध्ये ओमायक्रॉन आणि त्याच्याशी संबंधित संक्रमणांवर चिंताजनक माहिती आणि अहवाल प्रकाशित करण्यात आले आहेत.


इंसाकॉगच्या मते, जानेवारी महिन्यात, ओमायक्रॉनची लागण झालेल्या रूग्णांमध्ये लक्षणे अतिशय सौम्य होती किंवा रूग्ण लक्षणे नसलेले होते. म्हणजेच त्यांना कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. अशीच परिस्थिती 10 जानेवारीपर्यंत कायम होती. मात्र त्यानंतर रुग्णालयांमध्ये ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढतच गेली. शिवाय रुग्णांमध्ये अधिक गंभीर लक्षणे आणि संसर्गाचे प्रमाण जास्त होते. यावरून हे सिद्ध होते की ओमायक्रॉनला सौम्य किंवा कमकुवत विषाणू समजण्याची चूक आपल्या लोकांना खूप महागात पडू शकते.


देशाच्या विविध भागांतील कोविड नमुन्यांची अनुक्रमणिका इंसाकॉगच्या देखरेखीखाली केली जाते आणि त्यानंतर राज्य आणि जिल्हा स्तरावर अहवाल तयार केला जातो. ताज्या बुलेटिनमध्ये, इंसाकॉगद्वारे सांगण्यात आले आहे की कोविड रुग्णांची ओळख पटविण्यासाठी एस-जीन ड्रॉप आऊट चाचणी चुकीचा अहवाल देऊ शकते. म्हणजेच, अहवाल खोटा असू शकतो. एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असली तरी ते तपासात बाहेर येतेच असे नाही. त्यामुळे सावधगिरी आणि दक्षता बाळगणे आवश्यक आहे. RTPCR चाचणी आवश्यक आहे आणि लक्षणांच्या आधारे कोरोनावर योग्य उपचार करणे आवश्यक आहे.


इन्साकॉगच्या अहवालात असेही म्हटले आहे की, ओमायक्रॉनमुळे कोरोनाचे नवीन रुग्ण वेगाने वाढले आहेत. विशेषत: ओमायक्रॉन BA.2 या उपप्रकारामुळे संसर्ग वेगाने पसरत आहे. संसर्ग झालेल्या लोकांमध्ये ज्यांना कोविडची लस मिळालेली नाही किंवा ज्यांना दोन्ही डोस मिळालेले नाहीत असे लोक अधिक आहेत. या अहवालातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ओमायक्रॉन भारतात सामुदायिक प्रसाराच्या पातळीवर पोहोचला आहे. विशेषत: दिल्ली, मुंबईसारख्या महानगरांमध्ये त्याचा प्रसार झपाट्याने झाला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha