Turkish Air Strikes On Syria: तुर्कीने (Turkey) शनिवारी उशिरा उत्तर सीरियातील (Syria) अनेक शहरांना लक्ष्य केले. तुर्कीने कोबाने शहरासह उत्तर सीरियातील अनेक शहरांवर हवेतून बॉम्बहल्ला केला. सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सने सांगितले की, कुर्दिश नेतृत्वाखालील सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस (SDF) चे सहा सदस्य आणि सहा लष्करी सैनिक या हल्ल्यात ठार झाले. अनेक जण जखमी झाल्याचीही माहिती आहे.


दहशतवादी हल्ल्याचा सूड


तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये 13 नोव्हेंबरला झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर 81 जण जखमी झाले आहेत. सरकारने या हल्ल्यासाठी कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी (पीकेके) आणि सीरियन कुर्दिश वायपीजी मिलिशिया संघटनेला जबाबदार धरले. इस्तानबूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूड म्हणून कुर्दिश दहशतवाद्यांच्या लक्ष्यांवर हल्ले करण्यात आले आहेत.


तुर्कीने PKK ला जबाबदार धरल्यानंतर हे हल्ले
इस्तानबूल बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर तुर्कीने उत्तर सीरियातील अनेक शहरांवर बॉम्बहल्ला केला आहे. कुर्दिश मिलिशाच्या ताब्यात असलेल्या कोबाने शहरासह अनेक शहरांवर तुर्कीने हवाई हल्ले केल्याचे वृत्तात म्हटले आहे. कुर्दीच्या नेतृत्वाखालील सैन्याने आणि ब्रिटन-आधारित देखरेख गटाने सांगितले की, तुर्कीने कोबाने शहरासह उत्तर सीरियातील अनेक कुर्द शहरांवर शनिवारी उशिरा हवाई हल्ले करण्यात आले. वृत्तसंस्था एएफपीच्या वृत्तानुसार, इस्तानबूलमध्ये गेल्या रविवारी झालेल्या प्राणघातक बॉम्बस्फोटांसाठी तुर्कीने कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी (PKK) ला जबाबदार धरल्यानंतर हे हल्ले झाल्याचं सांगण्यात आलंय. कुर्दिशांच्या नेतृत्वाखालील सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस (SDF) चे प्रवक्ते फरहाद शमी यांनी ट्विट केले की, तुर्की विमाने कोबाने शहरावर अंदाधुंद बॉम्बफेक करत आहेत. 


एसडीएफचे प्रवक्ते काय म्हणाले?


सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसचे प्रवक्ते फरहाद शमी यांनी ट्विट केले: “आयएसआयएसचा पराभव करणाऱ्या कोबाने शहरावर तुर्कीच्या ताब्यातील विमानांनी बॉम्बफेक केली आहे. पीकेके आणि एसडीएफने इस्तानबूल हल्ल्यात त्यांचा सहभाग नाकारला आहे, ज्यात सहा लोक मारले गेले आणि 80 जखमी झाले. तुर्कस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने लढाऊ विमानाच्या उड्डाणाचा फोटो शेअर केला आणि शनिवारी उशिरा ट्विट करत म्हटले की "मृतांचा आकडा मोजण्याची वेळ जवळ आली आहे." तुर्कीच्या सीमेजवळील सीरियातील कोबाने हे कुर्दिश शहर 2014 मध्ये इस्लामिक स्टेट गटाने ताब्यात घेतले होते. 


हल्ल्यात दोन गावे बाधित


सीरियातील कुर्दिश नेतृत्वाखालील लष्कराने सांगितले की, हल्ल्यामुळे प्रभावित झालेल्या किमान दोन गावांमध्ये (Internally Displaced People)अंतर्गत विस्थापित लोक राहत होते. त्यात कोबानेच्या आसपासच्या पूर्वेकडील ग्रामीण भागांचाही समावेश आहे, ज्याला ऐन अल-अरब म्हणूनही ओळखले जाते.


13 नोव्हेंबरला इस्तंबूलमध्ये झाला होता बॉम्बस्फोट 


13 नोव्हेंबरला इस्तंबूलमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी 20 हून अधिक जणांना अटक केली होती. एका महिलेलाही अटक करण्यात आली. अल जझिराने आपल्या अहवालात सूत्रांच्या हवाल्याने दावा केला होता की या हल्ल्यात 3 लोक सामील होते. यापैकी एक महिला आणि दोन पुरुष होते. दुपारी 4.15 च्या सुमारास गर्दीच्या ठिकाणी हा स्फोट झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार - एक महिला जवळपास 40 मिनिटे बेंचवर बसली होती. यानंतर ती तेथे एक बॅग टाकून निघून गेली. काही मिनिटांनी स्फोट झाला. या बॅगेत बॉम्ब असल्याचे समजते.


 


इतर महत्वाच्या बातम्या


Twitter : ट्विटरवर डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एंट्री! मस्कच्या सर्वेक्षणानंतर अकाऊंट पुन्हा सुरू