Turkey: संयुक्त राष्ट्रांनी बुधवारी तुर्कीचे नाव बदलून तुर्किये करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. तुर्की आता तुर्किये या नावाने ओळखले जाईल. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी गेल्या डिसेंबरमध्ये त्यांची पुनर्ब्रँडिंग मोहीम सुरू केली. देशाच्या नामांतराबाबत एर्दोगन  म्हणाले की, तुर्कीये हे तुर्की लोकांच्या संस्कृतीचे, सभ्यतेचे आणि मूल्यांचे उत्कृष्ट प्रतिनिधित्व करते.


तुर्कीची भू-राजकीय भूमिका वाढत आहे, हे पाहता तुर्की देश आपल्या प्रतिमेबाबत अधिक जागरूक झाला आहे. जग तुर्कस्तानकडे कसे पाहत आहे, याबाबत राष्ट्राध्यक्ष एर्दोआन अधिक संवेदनशील झाल्याचे दिसतात. आपल्या देशाचे नाव तुर्की (तुर्की लोक त्यांच्या देशाला तुर्की म्हणतात) टर्की नावाच्या पक्ष्याशी मिळतेजुळते आहे, हे त्यांना आवडले नाही. टर्की पक्ष्याचे नाव तुर्कीच्या नावावरूनच ठेवण्यात आले आहे. हे पक्षी पहिल्यांदा तुर्कस्तानातून युरोपात आणले गेले होते.


एर्दोगन यांच्या रीब्रँडिंग मोहिमेदरम्यानच तुर्कीचे अधिकृत चॅनेल TRT वर्ल्डने देशाचे नाव तुर्कीये म्हणण्यास सुरुवात केली. नाव बदलण्यामागचे कारण असे की केंब्रिज शब्दकोशात टर्की/तुर्की या शब्दाचा अर्थ पराभूत किंवा मूर्ख आहे, म्हणून देशाचे नाव बदलण्यात आले आहे, असे सांगण्यात येत आहे. अशाच काही कारणांमुळे अनेक देशांनी आपल्या देशाचे नाव बदलले आहे.


नेदरलँड


नेदरलँडचे जुने नाव हॉलंड आहे, जे काही वर्षांपूर्वी बदलले आहे. देशाची प्रतिमा सुधारण्याच्या उद्देशाने नेदरलँड सरकारने हे पाऊल उचलले. डॉयचे वेलेच्या अहवालानुसार, हॉलंडचे नाव ड्रग्ज आणि कायदेशीर वेश्याव्यवसायामुळे कलंकित होते, ज्यामुळे सरकारने यापासून मुक्त होण्यासाठी देशाचे नाव बदलून नेदरलँड असे केले. 2020 पासून, सर्व सरकारी आणि गैर-सरकारी ठिकाणी हॉलंडच्या जागी नेदरलँडचा वापर केला जात आहे. नेदरलँड्सच्या 12 पैकी दोन राज्ये, दक्षिण हॉलंड आणि उत्तर हॉलंड, अजूनही हॉलंडच्या नावावर आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या