नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये सातत्यानं भूकंपाचे हादरे जाणवले. आता न्यूझीलंडसमवेत तीन राष्ट्रांमध्ये समुद्रात आलेल्या भूकंपामुळं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.


Earthquake in South Pacific पॅसिफिक महासागराच्या दक्षिण भागात बुधवारी भूकंपाचे जबर धक्के जाणवले. न्यूझीलंडसह वानुअतू, न्यू कॅलेडोनिया या भागांनाही भूकंपानं हादरा दिला. बुधवारी सायंकाळच्या सुमारास न्यूझीलंडच्या उत्तर भागात भूकंपाचे जबर हाजरे जाणवले. येथील बहुतांश भागांमध्ये त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र संस्थेच्या माहितीनुसार लॉयल्टी आयलंडपासून दक्षिण पूर्वेकडे 10 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाची तीव्रता 7.7 रिक्टर स्केल इतकी होती.


अतिशय शक्तिशाली अशा या भूकंपानंतर वानुअतू, फिजी बेटं या भागांत त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. ज्या पार्श्वभूमीवर 0.3 ते 1 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


उर्जा विभागाच्या भरती प्रक्रियेतील एसईबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा


पॅसिफिक महासागरामध्ये रिंग ऑफ फायर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या क्षेत्रात असणाऱ्या न्यूझीलंडमध्ये भूकंपाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या त्सुनामीच्या इशाऱ्याला पाहता सर्व आपत्तीव्यवस्थापन संस्थाही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शिवाय समुद्रकिनारी भागात राहणाऱ्यांनाही, सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं पुढील काही तास या भागांमध्ये नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.